शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

राहुल गांधींच्या दौºयाने काँग्रेसमध्ये चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:16 IST

ऐन महापालिका निवडणुकीच्या प्रारंभी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहूल गांधी यांचा नांदेड दौरा काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण करणारा ठरणार आहे. एकीकडे निवडणुकीची घोषणा आणि दुसºया दिवशी राहूल गांधींची सभा हा योग काँग्रेससाठी दुग्धशर्करा ठरला आहे. महापालिका निवडणुकीत या दौºयाचा काँग्रेसला निश्चितच लाभ मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : ऐन महापालिका निवडणुकीच्या प्रारंभी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहूल गांधी यांचा नांदेड दौरा काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण करणारा ठरणार आहे. एकीकडे निवडणुकीची घोषणा आणि दुसºया दिवशी राहूल गांधींची सभा हा योग काँग्रेससाठी दुग्धशर्करा ठरला आहे. महापालिका निवडणुकीत या दौºयाचा काँग्रेसला निश्चितच लाभ मिळणार आहे.महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा बुधवारी सायंकाळी झाली. या निवडणुकीची रणनीती काँग्रेसने तयार केली आहे. त्यातच खा. राहूल गांधींचे शुक्रवारी नांदेडसह मराठवाड्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नांदेडमध्ये होणाºया विभागीय मेळाव्यात राज्यभरातील काँग्रेस नेते नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर काँग्रेसमय होईल. महापालिकेच्या रणधुमाळीची सुरुवातच काँग्रेसकडून धडाकेबाज होत आहे. त्यामुळे आधीच विखुरलेल्या विरोधकांना सावरण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे याचा लाभ ऐन निवडणुकीत काँग्रेस निश्चितपणे उचलणार आहे. काँग्रेसच्या ध्येय धोरणांना खा. राहूल गांधी यांच्यासह राज्यभरातून आलेले नेते शुक्रवारी उजाळा देतील. त्याचवेळी देशात नोटबंदी, कर्जमाफी, जीएसटी आदी विषयामुळे असलेली अस्वस्थताही जनतेपुढे ठेवली जाईल.महापालिकेच्या स्थापनेपासून प्रारंभीचे एक वर्ष वगळता महापालिकेवर काँग्रेसचीच सत्ता आहे. ही सत्ता काबिज करण्याचे प्रयत्न होत असले तरी काँग्रेसजणांचा विजयाचा विश्वास विरोधकांना सुरुवातीपासूनच बॅकफुटवर नेणारा आहे.माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचे एकहाती नेतृत्व, विकासाची ध्यास तसेच दिवंगत शंकरराव चव्हाणांचे नांदेडसह मराठवाड्यासाठी केलेले कार्यही काँग्रेसला यशाकडे नेणारे आहे. महापालिका निवडणुकीची सूत्रे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर आणि माजी राज्यमंत्री आ. डी.पी. सावंत यांच्या हाती सोपवल्याचे खुद्द खा. अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. राजूरकरांचे आक्रमक तर सावंतांचे संयमी नेतृत्व सर्वांना एकत्र बांधणारेच ठरणार आहे.