शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मिनी घाटीने रेबीज ठरवून घाटीत पाठविलेला रुग्ण निघाला दारुडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 16:33 IST

घाटीत दाखल केल्यानंतर केले वॉर्डातून पलायन

ठळक मुद्देमिनी घाटीत घातला गोंधळ  रुग्णाला नातेवाईकांनी केले रुग्णालयात दाखल

औरंगाबाद : चार दिवसांपूर्वी कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णाने सोमवारी चिकलठाणा येथील मिनी घाटीत चांगलाच गोंधळ घातला. रुग्णाच्या वर्तणुकीमुळे डॉक्टरांनी त्याला थेट रेबीजमुळे रुग्ण पिसाळल्याचे ठरवून त्याला घाटीत पाठविले. मात्र, या रुग्णाने अतिमद्यमान केल्याचे घाटीत निदान झाले. त्यामुळे मिनी घाटीतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

एका रुग्णाला सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याच्या मित्रांनी उपचारासाठी चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजे मिनी घाटीत आणले होते. रुग्णालयात आणल्यानंतर अचानक त्याने जोरजोरात ओरडणे, इतरांच्या अंगावर धावणे, दात चावणे, गुडघ्यावर चालणे सुरूकेले. या घटनेमुळे संपूर्ण रुग्णालयात गोंधळ उडाला. डॉक्टर, परिचारिक ांबरोबर इतर रुग्ण घाबरले. बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण इकडून तिकडे पळत होते. जवळपास २० मिनिटे हा गोंधळ सुरूहोता. त्यामुळे बाह्यरुग्ण सेवाही विस्कळीत झाली. अखेर सुरक्षारक्षकांनी चादर टाकून रुग्णाला ताब्यात घेत एका कक्षात बंद केले. या रुग्णाने एका सुरक्षारक्षकाच्या अंगाला नखाने ओरखडले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या रुग्णाला कुत्र्याने चावा घेतला होता. त्याच्या वर्तणुकीवरून तो पिसाळलेला रेबीजचा रुग्ण म्हणून डॉक्टरांनी त्याला तात्काळ घाटीत पाठविले.  

त्याने पाणी पिले अन्...रेबीजचा रुग्ण आल्याने घाटी रुग्णालयाने उपचाराची तयारी केली; परंतु तेथेही तो गोंधळ घालत होता. मेडिसिन विभागातील वॉर्डात दाखल करताना सदर रुग्णाने अर्धी बाटली पाणी पिले. रेबीजच्या रुग्णांना पाण्याची भीती वाटते. त्यामुळे डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याने अतिमद्यपान केल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर अतिमद्यपानाचे उपचार करण्यात आले.  हा रुग्ण दुपारी ३ वाजेच्या सुमारास वॉर्डातून गायब झाला. याविषयी वॉर्डातील डॉक्टरांनी सीएमओंना माहिती दिली.

नावाचा गोंधळजिल्हा रुग्णालयाने सदर रुग्णाचे नाव कुंडलिक मोरे (३५, रा. राजनगर) असे सांगितले, तर घाटी रुग्णालयात सुनील कुंडलिक मोरे अशी नोंद असल्याची माहिती मेडिसिन विभागातर्फे देण्यात आली.

अतिमद्यपान केलेला रुग्णजिल्हा रुग्णालयातून रेबीजचा रुग्ण म्हणून त्याला घाटीत पाठविले होते.  मात्र, त्याने अतिमद्यपान केल्याचे आढळले. त्याच्यात रेबीजची लक्षणे नव्हती. त्याच्यासोबतचे नातेवाईकही ‘प्यायलेले’ होते. दुपारी तो वॉर्डातून अचानक गायब झाला. पोलिसांकडून त्याचा तपास केला जाईल.- डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, विभागप्रमुख, मेडिसिन विभाग, घाटी

डॉक्टरांना दिसली लक्षणे सदर रुग्णाला कुत्रा चावल्याची माहिती देण्यात आली होती. रुग्णाला घेऊन आलेले मित्र नातेवाईकांना बोलावण्यासाठी गेल्यानंतर रुग्णाने गोंधळ घातला. त्याच्यात रेबीजची लक्षणे होती, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्याला घाटीत पाठविले. त्याने मद्यपान केलेले होते, हे डॉक्टरांना का कळले नाही, यासह या सगळ्या प्रकाराची मंगळवारी चौकशी केली जाईल.- डॉ. अर्चना भोसले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :doctorडॉक्टरgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीMedicalवैद्यकीयAurangabadऔरंगाबाद