शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

'हम बच गये, मगर अपनो को खोने का मलाल'; आगीत बचावलेल्या कामगारांचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 18:31 IST

मध्यरात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास कंपनीला अचानक आग लागल्याने काही कामगारांनी कंपनीच्या छतावरून चढावर चढत खाली उड्या मारून आपला जीव वाचविला

वाळूज महानगर : उद्योगनगरीतील सनशाईन या कंपनीला लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याने त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कामगारांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. या दुर्दैवी घटनेत जवळचे नातलग व सहकारी अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने त्यांच्या आठवणीने कामगारांचे डोळे पाणावले होते.

या कंपनीत काम करण्यासाठी ठेकेदार मो. हसिनोमुद्दीन मुस्ताक यांनी गावाकडील कामगारांना कामासाठी आणले होते. या कंपनीत काम करणाऱ्या कामगार व ठेकेदाराची कंपनीमालक साबेरखान पठाण याने कंपनीतील सहा रूममध्ये व्यवस्था केली होती. या कामगारांना ठेकेदार मो. हसिनोमुद्दीन याची पत्नी इस्मजहॉ शेख ही स्वंयपाक करून जेऊ घालत असे. शनिवारी कंपनीतील कामकाज संपल्यानंतर रात्री जेवण करून कामगार आपआपल्या रूममध्ये झोपण्यासाठी निघून गेले होते. मध्यरात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास कंपनीला अचानक आग लागल्याने काही कामगारांनी कंपनीच्या छतावरून चढावर चढत खाली उड्या मारून आपला जीव वाचविला, तर ठेकेदार मो. हसिनोमुद्दीन याने पत्नी इस्मतजॅहा, मुलगा मो. मुज्जमील व मुलगी आयशा यांना कसेबसे कंपनीतून बाहेर काढत त्यांचे प्राण वाचविले. मात्र, पत्नी व मुलांना वाचविण्याच्या प्रयत्नात वृद्ध वडील मो. मुस्ताक हे कंपनीत अडकल्याने त्यांचा या घटनेत मृत्यू झाला. या कंपनीत काम करणारा मो. दिनारूल हा वाचला असून, त्याचा भाऊ मो. एक्बाल हा मात्र त्यास सोडून गेला.

बच गये, मगर अपनो को खोने का मलाल...या आगीच्या घटनेत ठेकेदार मो.हसीनोमुद्दीन, पत्नी इस्मत जहा व दोन्ही मुले नशीब बलवत्तर असल्याने बचावली आहेत. पती मो.हसीनोमुद्दीन यांनी जिवाची तमा न बाळगता मला व दोन्ही मुलांना आगीतून बाहेर काढले. मात्र वडील मो.मुस्ताक यांना वाचविता न आल्याने दोघे पती-पत्नी शोकसागरात बुडाले होते. या दुखदप्रसंगी इस्मतजहॉ यांनी रब की मेहरबानी हम बच गये, मगर अपनो को खोने मलाल जिंदगीभर रहेंगा असे म्हणताना त्यांचा कंठ दाटून आला होता.

अपने भाई को न बचाने का गमया घटनेत मो. दिनारुल हा सुदैवाने वाचला असून त्याचा भाऊ मो.एक्बाल हा कमनशिबी ठरल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. सभी कह रहे थे, भाई सिर्फ घायल हुआ है, मगर बाद मे पता चला भाईकी मौत हो चुकी, इससे गहरा सदमा लगा है. अपने भाई को न बचाने का गम हमेशा रहेगा, असे मो.दिनारुल याने रडतच सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादfireआगWalujवाळूज