शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

विद्यापीठात विज्ञान दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:18 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विज्ञान विभागातर्फे विज्ञान दिनानिमित्त दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती पत्रकार परिषदेत समन्वयक डॉ. गुलाब खेडकर यांनी दिली

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विज्ञान विभागातर्फे विज्ञान दिनानिमित्त दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती पत्रकार परिषदेत समन्वयक डॉ. गुलाब खेडकर यांनी दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटन २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सिफार्ट सभागृहात होईल.

विद्यापीठात विज्ञान दिनानिमित्त मागील पाच वर्षांपासून प्रत्येक विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी प्रत्येक विभागात कार्यक्रम न होता सर्वांचा मिळून एकत्रित कार्यक्रम आयोजित केला आहे. भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांचा शोध असलेल्या ‘रमण इफेक्ट’च्या निमित्ताने २८ फेब्रुवारी हा विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने विद्यापीठातील विज्ञान विद्याशाखेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनात आवड निर्माण व्हावी, संशोधकांचे कौतुक करण्याच्या हेतूने स्पर्धांचे आयोजन केल्याचे नियोजन समितीचे सदस्य डॉ. बापू शिंगटे यांनी सांगितले. यानिमित्त आयोजित स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २७ फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागेल. यात लाईफ अ‍ॅण्ड इनव्हायरमेंट, केमिकल अ‍ॅण्ड फार्मास्युटिकल, फिजिक्स अ‍ॅण्ड स्मार्ट मटेरियल आणि कॉम्प्युटर अ‍ॅण्ड मॅथेमॅटिकल सायन्सेस विभागात स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धांमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचे सेमिनार, पोस्टर प्रदर्शन, शोधनिबंध आदींचा समावेश आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागातून प्रत्येकी तीन पारितोषिके देण्यात येतील. ही पारितोषिके पहिला, दुसरा क्रमांक न काढता त्या- त्या विषयातील प्रसिद्ध शास्त्रज्ञांच्या नावाने देण्यात येणार असल्याचे डॉ. शिंगटे यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये १ मार्च २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या काळात प्रकाशित झालेल्या विद्यार्थ्यांना शोधनिबंध स्पर्धेत सहभागी होता येईल. या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही संयोजन समितीतर्फे करण्यात आले. या पत्रकार परिषदेला संयोजन समितीचे सदस्य डॉ. बी. बी. वायकर, डॉ. विक्रम खिलारे, डॉ. प्रभाकर उंदरे उपस्थित होते.---------------

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद