शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेद औषधीत अ‍ॅलोपॅथीची मात्रा; कंपनीविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:15 IST

कामवर्धक आणि गुडघे दुखीवरील आयुर्वेद औषधात अ‍ॅलोपॅथी रसायनाची भेसळ करून ती संपूर्ण आयुर्वेदिक असल्याचे सांगून जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी अन्न व औषधी प्रशासन विभागाने दुकानदारासह दोन राजस्थानी औषध निर्मिती कंपन्यांविरुद्ध सिटीचौक ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंदविले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कामवर्धक आणि गुडघे दुखीवरील आयुर्वेद औषधात अ‍ॅलोपॅथी रसायनाची भेसळ करून ती संपूर्ण आयुर्वेदिक असल्याचे सांगून जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी अन्न व औषधी प्रशासन विभागाने दुकानदारासह दोन राजस्थानी औषध निर्मिती कंपन्यांविरुद्ध सिटीचौक ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंदविले. या दुकानातून सुमारे ४० हजार रुपये किमतीची औषधी जप्त करण्यात आली.सारंग अविनाश जोशी (गुलमंडी), प्रेमपालसिंग धुना (रा. गंगानगर, राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत. सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, अन्न व औषधी विभागाचे निरीक्षक माधव निमसे यांना १४ सप्टेंबर २०१६ रोजी सुपारी हनुमान रोड येथील श्रीकृष्ण आयुर्वेदिक भांडार ३ एक्स गुटिका हे कामवर्धक आयुर्वेद औषध आणि मे. बिर्ला फार्मास्युटिकल्स कंपनीचे गुडघे दुखीवरील औषध म्हणून रुमाविन वटी विक्रीसाठी असल्याचे आढळले. या औषधाचे सॅम्पल त्यांनी जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. या दोन्ही सॅम्पलच्या तपासणीचा अहवाल प्रयोगशाळेकडून अन्न व औषधी प्रशासन विभागाला प्राप्त झाला. सेक्सवर्धक थ्री एक्स गुटिकामध्ये अ‍ॅलोपॅथिक सिल्डेनोफिल सायट्रेट हे घटकद्रव्याचे मिश्रण केलेले आढळले, तर रुमाविन वटीमध्ये निमेसुलाइड व डायक्लोफेनॉक सोडियम या अ‍ॅलोपॅथिक औषधाची मात्रा आढळली.मान्यताप्राप्त औषध निर्माण कंपनीलाच अ‍ॅलोपॅथीच्या औषधी तयार करण्याचे अधिकार असल्याने निरीक्षक निमसे यांनी दुकानदार सारंग जोशी यांच्याकडे औषध कंपन्यांची माहिती विचारली. तेव्हा राजस्थानमधील गंगानगर येथील प्रेमपालसिंग धुना यांच्या कंपनीकडून कामवर्धक गुटिका तर रुमाविन वटी ही संतोषकुमार बिर्ला, नवीनचंद्र बिर्ला (रा. गंगानगर, राजस्थान) यांच्याकडून मागविली असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही कंपन्यांच्या संचालकांना तक्रारदार यांनी औषधी तयार करण्याचा परवाना सादर करण्याचे सांगितले असता दोन्ही कंपनीने त्यांना सदर औषधी त्यांच्या कंपनीची नसल्याचे दोन्ही तक्रारदार यांना कळविले. आरोपी हे कारवाई टाळण्यासाठी टोलवाटोलवी करीत असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. यात आठ महिन्यांचा कालावधी उलटल्याने तक्रारदार यांनी अखेर २२ आॅगस्ट रोजी सिटीचौक ठाण्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद केली. आरोपीच्या दुकानातून सुमारे ४० हजारांची औषधी जप्त केली.