शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सेलू, परभणी येथील डॉक्टरांच्या लेटरहेडवर नशेच्या गोळ्यांची खरेदी; औरंगाबादेत दोघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 19:46 IST

'एनडीपीएस' सेलचे सहायक पोलीस निरीक्षक मोसीन सय्यद यांना शहानूरमियाँ दर्गा चौकात एक जण गोळ्या (बटन) विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.

औरंगाबाद : शहरातील नशेच्या गोळ्यांचा बाजार उठविण्यासाठी पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. यासाठीच नेमलेल्या 'एनडीपीएस' पथकाने गोळ्यांची विक्री करताना दोघांना पकडले. त्यांच्या चौकशीत परभणी, सेलू येथील डॉक्टरांच्या लेटरहेडवर लातूर, परभणीतील वेगवेगळ्या मेडिकलमधून गोळ्यांची खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईत ६०० नशेच्या गोळ्यांसह १० लाख २४ हजार २८२ रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.

'एनडीपीएस' सेलचे सहायक पोलीस निरीक्षक मोसीन सय्यद यांना शहानूरमियाँ दर्गा चौकात एक जण गोळ्या (बटन) विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार लावलेल्या सापळ्यात राम धोंडू काळे (रा. श्रेयनगर) याला पकडले. अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे नायट्रोसन नावाच्या ४५ गोळ्या आढळून आल्या. तसेच विकलेल्या गोळ्यांचे १३९० रुपये आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला. काळेची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने दीपक साहेबराव हावळे (रा.एन २, ठाकरेनगर) याच्याकडून गोळ्या खरेदी केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी हावळेचा शोध घेतला असता तो चारचाकीत (एमएच २० एफ यू ८०८६) होता. तो सुद्धा गोळ्यांची विक्री करीत होता. त्याच्याकडे नायट्रोसन नावाच्या ५५५ गोळ्यासह एक शस्त्र सापडले. त्याच्या चारचाकीसह इतर मुद्देमाल पोलिसांच्या पथकाने जप्त केला. 

हावळेकडे गोळ्या कोठून आणल्या, याविषयी चौकशी केली. तेव्हा त्याने परभणी, सेलू येथील डॉक्टरांच्या लेटरहेडवर नशेच्या गोळ्या लातूर, परभणी येथील मेडिकलमधून खरेदी केल्या आहेत. या गोळ्या चढ्या दराने शहरात विक्री करण्यात येत होत्या. या दोन्ही आरोपींच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. ही कामगिरी सहायक निरीक्षक मोसीन सय्यद, सहायक फाैजदार नंदकुमार भंडारे, सय्यद शकील, प्रकाश गायकवाड, आनंद वाहूळ, धर्मराज गायकवाड, प्राजक्ता वाघमारे, शंकर सुदरहेडे व औषघी निरीक्षक जे.डी. जाधव यांच्या पथकाने केली.

अमली पदार्थांची विक्री होत असेल तर कळवाआपल्या परिसरात, शेजारी जर कोणी गांजा, नशेच्या पदार्थांची विक्री करत असेल तर त्यांची माहिती पोलिसांना द्यावी, पोलीस तत्काळ कारवाई करतील. मागील काही घटनांमध्ये आरोपींनी नशेचे पदार्थ घेऊनच खून, मारामाऱ्यासह इतर प्रकारचे गुन्हे केल्याचे उघड झाले होते. त्यामुळे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी स्पेशल सेलची स्थापना केली. हा चमू उत्तम प्रकारे कार्य करत आहे. अंमली पदार्थांच्या ठोक विक्रेत्यांवर तर कारवाई होतच आहे. किरकोळ विक्रेतेही पोलिसांनी समजल्यास कारवाई सोपी जाईल.- डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी