पुणे क्लबची यंग इलेव्हन संघावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:31 AM2018-02-19T00:31:23+5:302018-02-19T00:31:41+5:30

गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या एआयओसीतर्फे आयोजित अखिल भारतीय क्रिकेट स्पर्धेत पुणे क्लब संघाने यंग इलेव्हन संघावर मात केली. पुणे क्लबने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ८ बाद १५६ धावा केल्या.

 Pune XI beat Young XI team | पुणे क्लबची यंग इलेव्हन संघावर मात

पुणे क्लबची यंग इलेव्हन संघावर मात

googlenewsNext

औरंगाबाद : गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या एआयओसीतर्फे आयोजित अखिल भारतीय क्रिकेट स्पर्धेत पुणे क्लब संघाने यंग इलेव्हन संघावर मात केली. पुणे क्लबने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ८ बाद १५६ धावा केल्या. त्यांच्याकडून अनिकेत पारवाल याने २६ चेंडूंत ४ षटकार व ३ चौकारांसह ५३, अभिनव पारी याने २0 चेंडूंत ४ चौकारांसह ३0 व आशिष सूर्यवंशीने ९ चेंडूतच ३ षटकार व एका चौकारासह नाबाद ३0 धावा केल्या. यंग इलेव्हनकडून संदीप गायकवाडने २६ धावांत २ गडी बाद केले. प्रवीण क्षीरसागर, स्वप्नील चव्हाण व उदय पांडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात यंग इलेव्हन संघ ८ बाद १४४ पर्यंत मजल मारूशकला. त्यांच्याकडून नीरज शिमरेने ४ चौकारांसह २२ चेंडूंत २६, अजय काळेने १२ चेंडूंत ३ षटकार व एका चौकारासह २७ धावा केल्या. राहुल शर्माने १८ धावांचे योगदान दिले. पुणे क्लबकडून आशिष सूर्यवंशीने २१ धावांत २, पी. परदेशी याने ३४ धावांत २, शुभमने २१ धावांत ३ गडी बाद केले. विशाल गीते व प्रसाद पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. दुसºया सामन्यात एमआर डेकोरेटर अलॉफ्ट संघाने २0 षटकांत ६ बाद १९८ धावा केल्या. त्यांच्याकडून सय्यदने ३४ चेंडूंत ६ षटकार व ३ चौकारांसह ६६, अलीमने ३६, कौसीन कादरीने ३३ धावा केल्या. बेनेक्सकडून सचिन शेडगेने ३५ धावांत ३ गडी व आशिष देशमुखने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात बेनेक्स संघ १९ षटकांत १३८ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून श्रीकांतने ३३ चेंडूंत एक षटकार व ७ चौकारांसह ५१ धावा केल्या. एमआर डेकोरेटर अलॉफ्टकडून सय्यद जावेद, सुशील अरक व सय्यद यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

Web Title:  Pune XI beat Young XI team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.