शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

यापुढे मनोरुग्णाच्या संमतीशिवाय मानसोपचारतज्ज्ञांना उपचार करता येणार नाहीत; जुलैपासून नवीन कायदा लागू होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 18:46 IST

देशात जुलैपासून नवीन मानसिक आरोग्य सेवा कायदा (मेंटल हेल्थ केअर अ‍ॅक्ट) लागू केला जाणार आहे. या कायद्यामुळे मनोरुग्णाच्या संमतीशिवाय मानसोपचारतज्ज्ञांना उपचारच करता येणार नाही.

ठळक मुद्देदेशात १५ कोटी नागरिक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. जुलैपासून नवीन मानसिक आरोग्य सेवा कायदा (मेंटल हेल्थ केअर अ‍ॅक्ट) लागू केला जाणार आहे

औरंगाबाद : देशात जुलैपासून नवीन मानसिक आरोग्य सेवा कायदा (मेंटल हेल्थ केअर अ‍ॅक्ट) लागू केला जाणार आहे. या कायद्यामुळे मनोरुग्णाच्या संमतीशिवाय मानसोपचारतज्ज्ञांना उपचारच करता येणार नाही. नातेवाईकांपेक्षा जो व्यक्ती आजारी आहे, ज्याची विचार क्षमताच नाही, त्याची मंजुरी घेऊन त्याच्या इच्छेनुसार उपचार करावे लागतील. नातेवाईकांच्या हक्कावर गदा आणून एकप्रकारे हा कायदा मनोरुग्णांना उपचारापासून वंचित ठेवणारा आहे, असे इंडियन सायकॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मृगेश वैष्णव म्हणाले. 

औरंगाबाद सायकॅट्रिक सोसायटीतर्फे रविवारी (दि.२०)  मानसिक आरोग्य सेवा कायदा २०१७ विषयी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. वैष्णव बोलत होते.  चर्चासत्रात डॉ. सुरेश बदामठ, डॉ. अश्विन मोहन, डॉ. ओ. पी. सिंग, डॉ. निमेश देसाई, डॉ. राजेश धुमे आणि डॉ. मृगेश वैष्णव यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी औरंगाबाद सायकॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजीव सावजी, सचिव डॉ. विक्रांत पाटणकर, कोषाध्यक्ष डॉ. अमर राठी, डॉ. एन. डी. कुलकर्णी, डॉ. गजानन कुलकर्णी, डॉ. मोनाली देशपांडे, डॉ. आशिष मोहिदे आदी उपस्थित होते.

डॉ. वैष्णव म्हणाले, नवा कायदा हा भारतीय परिस्थितीनुसार नाही. मानसिक आजारांविषयी आजही समाजात जनजागृती नाही. हा कायदा बनविताना इंडियन सायकॅट्रिक सोसायटीलादेखील विश्वासात घेण्यात आले नाही. देशात १५ कोटी नागरिक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना उपचाराची गरज आहे; परंतु कायद्यामुळे या लोकांना सामान्य प्रवाहात आणण्यापासून रोखले जात आहे, असे ते म्हणाले. आतापर्यंत मनोरुग्णाला नातेवाईक उपचारासाठी घेऊन येत असे आणि डॉक्टर उपचार करत. यापुढे जोपर्यंत मनोरुग्ण संमती देणार नाही, तोपर्यंत तज्ज्ञाला उपचारच करता येणार नाही. रु ग्णाने जर काही लिहून ठेवले असेल, तर त्याचेही पालन करावे लागेल. जुलैपासून हा कायदा लागू होईल. यामध्ये प्रत्येक ठिकाणी मानसिक आरोग्य रिव्हू बोर्ड तयार केले जातील. प्रत्येक रुग्णालयाला या कायद्याचे पालन करावे लागेल.

नव्या कायद्यातील काही बाबीआत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीस दोषी मानून दंडीत केले जाणार नाही, अशा व्यक्तीस मानसिक आधार आणि वैद्यकीय मदत दिली जाईल. मानसिक आजारांचा आरोग्य विम्यात समावेश केला जाईल. या कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीस मानसिक आजारावर सन्मानपूर्वक उपचार मिळविण्याचा अधिकार राहील. बेघर आणि दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या मनोरुग्ण व्यक्तीस मोफत उपचार मिळतील.

कायद्यातील काही त्रुटीआरोग्य विम्यामध्ये कोणकोणते मनोविकार अंतर्भूत आहेत, याबद्दल स्पष्टता नाही. या कायद्यान्वये गठित होणाऱ्या शासन नियुक्त समितीवर मानसोपचारतज्ज्ञांना पुरेसे प्रतिनिधित्व नाही. याचा परिणाम मनोरुग्णाच्या उपचार पद्धतीवर होऊ शकतो. मनोरुग्णाला उपचार पद्धत निवडण्याचा अधिकार दिला आहे. हे काही रुग्णांच्या योग्य उपचारात अडथळा ठरू शकतो,अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञांनी दिली.

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्यGovernmentसरकार