शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘समांतर’च्या सद्य:स्थितीची माहिती द्या; खंडपीठाचे महापालिका आयुक्तांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 19:19 IST

समांतर जलवाहिनी प्रकल्पाची सद्य:स्थिती नेमकी काय आहे, याबाबतचे सविस्तर शपथपत्र सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. आर. जी. अवचट यांनी महापालिका आयुक्तांना सोमवारी दिले आहेत.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनी प्रकल्पाची सद्य:स्थिती नेमकी काय आहे, याबाबतचे सविस्तर शपथपत्र सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. आर. जी. अवचट यांनी महापालिका आयुक्तांना सोमवारी दिले आहेत. याचिकेची पुढील सुनावणी १० डिसेंबर रोजी होणार आहे. 

समांतर जलवाहिनी योजनेच्या विरुद्ध खंडपीठात चार याचिका दाखल झाल्या आहेत. पाण्याच्या खाजगीकरणाविरुद्ध स्थापन झालेल्या नागरी कृती समितीतर्फे प्रा. विजय दिवाण यांनी २०१५ मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. या शिवाय इतर तीन याचिका प्रलंबित आहेत. प्रा. दिवाण यांनी त्यांच्या जनहित याचिकेत समांतर योजनेचे पुनरुज्जीवन केल्याच्या ठरावाला दिवाणी अर्जाद्वारे आव्हान दिले आहे.

महापालिकेने १ आॅक्टोबर २०१६ रोजी ‘औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी’ कंपनीसोबतचा करार रद्द केला होता. या कंपनीने नियोजनबद्ध व कालबद्ध मर्यादेत काम केले नाही. अकार्यक्षमतेचा आणि आर्थिक नियोजनाचा अभाव असल्याचा ठपका पालिकेने कंपनीवर ठेवला होता. औरंगाबाद शहराची लोकसंख्या १५ लाख असून आज पाणीपुरवठ्याची अवस्था बिकट झाली आहे. शहरामध्ये ३ दिवसाआड तर काही भागांत ४ दिवसाआड पाणीपुरवठा होतो. 

जनहित आणि नगरसेवकांच्या भावना लक्षात घेता या समांतर पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्याबाबतचा ठराव पालिका आयुक्तांनी २४ जुलै २०१८ रोजी सादर केला होता; परंतु या ठरावावर ६, ११ आणि १७ आॅगस्ट रोजी विविध कारणांमुळे सर्वसाधारण सभेत चर्चा झाली नाही. अखेर ४ सप्टेंबर २०१८ रोजी समांतर जलवाहिनी प्रकल्प पुनरुज्जीवित करण्याचा ठराव औरंगाबाद महापालिकेने मंजूर केला. 

औरंगाबाद महापालिकेने करार केला आणि रद्दही केला. आता दुसऱ्या एका भागीदारासह करार करण्याचा घाट घातला आहे. याला याचिकाकर्त्याचा आक्षेप आहे. महापालिकेने कंपनीविरुद्ध लवादासमोर १६८० कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये २३ आॅगस्टला या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन आवश्यक आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. या आणि अनेक घटना महापालिकेत आणि न्यायालयाबाहेर घडत आहेत. त्यामुळे या प्रकल्पाची नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याची माहिती शपथपत्राद्वारे सादर करावी, असा युक्तिवाद दिवाण यांचे वकील उदय बोपशेट्टी यांनी केला. त्यांना अ‍ॅड. अजित गायकवाड पाटील यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :Parallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ