शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Video: आंदोलकांनी सत्तारांच्या भावाची गाडी अडवली; भावाविरोधात घोषणा देण्यासही भाग पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 19:09 IST

आंदोलकांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या भावाच्या गाडीवरील विधानसभा सदस्य असलेले स्टिकर देखील काढायला लावले

- श्यामकुमार पुरेसिल्लोड: तालुक्यातील मराठा आंदोलकांनी निमखेडा टाकळी जिवरग रस्त्यावर आज सकाळी आंदोलन सुरू असताना अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांचे भाऊ मजूर सोसायटीचे संचालक अब्दुल गफ्फार यांची गाडी अडवली. यावेळी वाहनावरील विधानसभा सदस्य असे लावलेले स्टिकर आंदोलकांनी काढायला लावले. तसेच अब्दुल गफ्फार यांना भाऊ अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करायला लावली.

तालुक्यातील निमखेडा टाकळी जिवरग रस्त्यावर आज सकाळी साडेअकरा वाजेच्यादरम्यान मराठा आंदोलकांनी आंदोलन केले. यावेळी यावेळी विधानसभा सदस्य असे स्टीकर दिसल्याने आंदोलकांनी मंत्री अब्दुल सत्तार मध्ये असल्याचे समजून गाडी अडविली. मात्र  या गाडीमध्ये अब्दुल सत्तार नव्हते त्यांचे भाऊ  अब्दुल गफ्फार होते. त्यांच्या गाडीला विधानसभा आमदार चे स्टिकर लावलेले असल्याने जमावाने त्यांच्या गाडीचे स्टिकर काढून टाकण्यास भाग पाडले. त्यानंतर अब्दुल गफ्फार यांना आंदोलकांनी गाडी खाली उतरवले. यावेळी अब्दुल गफ्फार यांनी मी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे, असे आंदोलकांना सांगितले. तेव्हा आंदोलकांनी मग अब्दुल सत्तारांच्या विरोधात घोषणा देण्याचा आग्रह केला. यावर अब्दुल गफ्फार यांनी थेट भावाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

दरम्यान, अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विविध कामाचे उद्घाटन झालेल्या कासोद येथे लावलेल्या  या सर्व पाट्याआंदोलकांनी उखडून फेकल्या. तर तालुक्यातील गव्हाली येथे सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणात तांडा बाजार येथील  ७३ मुस्लिम बांधवांनी सहभाग घेत आरक्षण आंदोलनास पाठिंबा दिला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAbdul Sattarअब्दुल सत्तार