शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक जिल्ह्यात संसर्गजन्य रोग रुग्णालयाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 19:09 IST

स्वतंत्र रुग्णालयामुळे संसर्गजन्य आजारांवरील उपचार आणि प्रतिबंधाला योजनाबद्ध स्वरूप देणे शक्य होईल.

ठळक मुद्देसंसर्गजन्य आजारांसाठी स्वतंत्र रुग्णालयांची गरज समोर आली आहे. . संसर्गजन्य उपचारांची व्यवस्था एका छताखाली येईल. 

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयात अन्य रुग्णसेवा थांबवून केवळ कोरोनाचे उपचार करण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती ओळखून प्रत्येक जिल्ह्यात आगामी काळात संसर्गजन्य रोगांच्या उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित केले  आहे. 

शहरात चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय हे ३० मार्चपासून पूर्णपणे कोरोना रुग्णालयात रुपांतरित झाले.  ही परिस्थिती अन्य शहरांतही पाहायला मिळत आहे.  त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संसर्गजन्य रोगांचे रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित केले जात आहे.

कोरोनाची चर्चा सुरू झाली की, सध्या पुण्यातील  डॉ. नायडू रुग्णालयाचे नाव घेतले जाते. हे रुग्णालय सव्वाशे वर्षांहून अधिक काळ विविध संसर्गजन्य आजारांचा समर्थपणे मुकाबला करीत आहे. प्लेग, देवी, कॉलरा, इन्फ्ल्युएन्झा, पोलिओ या सध्या हद्दपार झालेल्या आणि स्वाइन फ्लू , बर्ड फ्लू, सार्स, इबोला, निपाह आणि कोरोना या संसर्गजन्य आजारांचा मुकाबला करीत हे रुग्णालय नागरिकांच्या दिमतीला उभे आहे; परंतु अन्य शहरांत अशा रुग्णालयांचा अभाव आहे. त्यामुळे  संसर्गजन्य आजारांसाठी स्वतंत्र रुग्णालयांची गरज समोर आली आहे. स्वतंत्र रुग्णालयामुळे संसर्गजन्य आजारांवरील उपचार आणि प्रतिबंधाला योजनाबद्ध स्वरूप देणे शक्य होईल. संसर्गजन्य उपचारांची व्यवस्था एका छताखाली येईल. 

कोरोनाच्या नियंत्रणानंतर प्रस्ताव : प्रत्येक जिल्ह्यात संसर्गजन्य  रोगासाठी रुग्णालय प्रस्तावित  करण्यात येत आहे. औरंगाबादचाही त्यात समावेश असेल. कोरोनाच्या उपचारासाठी सज्ज करण्यात आलेल्या इमारती आणि जेथे खाटा, व्हेंटिलेटर, आॅक्सिजनसह अन्य यंत्रणा आहे, त्याचे रूपांतर कोरोनाच्या नियंत्रणानंतर संसर्गजन्य रोगांच्या रुग्णालयात करावे, असे प्रस्तावित केले जाईल.- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMaharashtraमहाराष्ट्रAurangabadऔरंगाबादHealthआरोग्य