शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील ११ अपर तहसील कार्यालयांचा प्रस्ताव लालफितीत; सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 19:09 IST

कॅबिनेटसमोर हा प्रस्ताव जाईल. त्यानंतर कार्यालय कर्मचारी, खर्चासह इतर बाबी तपासल्यानंतर मंजुरी मिळेल.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ११ अपर तहसील व १ अपर जिल्हाधिकारी कार्यालय नव्याने सुरू करण्याचा प्रस्ताव मार्च २०२५ मध्ये शासनाने विभागीय प्रशासनाकडून मागविला होता. त्यावर आजपर्यंत काहीही निर्णय झालेला नाही. जालना, नांदेड, लातूर, परभणी या ४ महापालिकांसाठी अपर तहसील करण्याचा प्रस्ताव होता.

मराठवाड्याची वाढलेली लोकसंख्या, महापालिकांची संख्या, नागरिकांना सुविधा मिळण्यास होणारा विलंब, भविष्यातील विभागीय आयुक्तालयाचे विभाजन व नवीन जिल्ह्यांची निर्मिती या सगळ्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावांना महत्त्व आहे. मराठवाड्यात सध्या ७६ तालुक्यांत ७७ तहसील कार्यालये आहेत. ११ अपर तहसील कार्यालय मान्यतेसह सुरू झाल्यानंतर ८८ कार्यालये होतील. विभागातील ५ महापालिका हद्दीत तालुक्यासाठी सध्याचे ग्रामीण व शहरासाठी नवीन अपर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव आहे. कॅबिनेटसमोर हा प्रस्ताव जाईल. त्यानंतर कार्यालय कर्मचारी, खर्चासह इतर बाबी तपासल्यानंतर मंजुरी मिळेल.

नांदेडमध्ये अपर जिल्हाधिकारी कार्यालयनांदेड जिल्ह्याची लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार पाहता नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. १६ तालुक्यांचा हा जिल्हा आहे. नांदेडसह ४ तालुक्यांत अपर तहसील कार्यालयांचा प्रस्ताव आहे. मतदारसंघ रचना, भौगोलिक अंतर, लोकसंख्या, महसूल दस्तऐवज आणि विविध प्रमाणपत्रांची मागणी संख्येसह गावे, तलाठी सजा, मंडळ कार्यालये, उपविभागीय कार्यालयांचा विचार झाला आहे.

कुठे दिला होता प्रस्ताव

जिल्हा..................प्रस्तावित अपर तहसील ठिकाणछत्रपती संभाजीनगर.......अजिंठाजालना.....................शहरनांदेड................शहर, हदगाव (तामसा), किनवट (इस्लामपूर), मुखेड (मुक्रमाबाद)परभणी..............शहर, जिंतूर (बोरी किंवा चारठाणा)लातूर.............शहरबीड................शहर, आष्टी (कडा)

भविष्यातील जिल्हे निर्मिती, विभाजनाची पायाभरणीमराठवाडा विभागीय आयुक्तालय विभाजन व नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचे गुपित या प्रस्तावांच्या मागे दडले आहे. तत्कालीन विभागीय आयुक्त उमाकांत दांगट समितीने आयुक्तालयाच्या त्रिभाजनाचा अहवाल शासनाला देऊन दशक लोटले आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यांत आयुक्तालयाचे त्रिभाजन व्हावे की, विभाजन करावे, यावरून राजकीय वतुर्ळात अजूनही खेचाखेची सुरू आहे. सध्या मराठवाड्यात ८ जिल्हे आहेत. १९८१ साली छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाजन करून जालना, १९९९ साली परभणीचे विभाजन करून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती केली. २०२० मध्ये लातूर, बीड आणि नांदेड जिल्ह्यांच्या विभाजन करण्याचा मुद्दा चर्चेत होता.

अद्याप काहीही अपडेट नाहीअपर तहसील निर्मितीबाबत शासनाकडून अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. प्रस्ताव शासनाकडे गेला आहे.- जितेंद्र पापळकर, विभागीय आयुक्त.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागMarathwadaमराठवाडाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर