शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

२०४ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा सभेत प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:26 IST

महापालिकेत मागील १८ वर्षांपासून दैनिक वेतनावर काम करणा-या कर्मचा-यांना सेवेत कायम करा, असा अशासकीय ठराव बुधवारी होणा-या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेत मागील १८ वर्षांपासून दैनिक वेतनावर काम करणा-या कर्मचा-यांना सेवेत कायम करा, असा अशासकीय ठराव बुधवारी होणा-या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे. सोलापूर महापालिकेच्या धर्तीवर या कर्मचा-यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. १८ वर्षांपूर्वी २६८ कर्मचारी दैनिक वेतनावर होते. त्यातील ६४ कर्मचारी निवृत्तही झाले. काही जणांचा मृत्यूही झाला.१९९९-२००० मध्ये महापालिकेने बॅक डोअर २६८ कर्मचाºयांची दैनिक वेतनावर नियुक्ती केली. ज्या पद्धतीने शासनाने १,१२४ कर्मचाºयांना सेवेत कायम केले त्याच पद्धतीने या कर्मचा-यांना कायम करता येईल, असे निकष लावण्यात आले होते. या कर्मचा-यांना घेताना आरक्षण, बिंदुनामावली आदी कोणतेच निकष गृहीत धरण्यात आले नाहीत. त्यामुळे आजपर्यंत शासनाने या कर्मचा-यांना कायम करण्यासंदर्भात हिरवी झेंडी दाखविली नाही. आज नाही, तर उद्या सेवेत कायम होऊ, या आशेवर कर्मचारी अत्यंत तुटपुंजा पगारावर काम करीत आहेत.१९ जून १९९९ रोजी सर्वसाधारण सभेने प्रस्ताव क्रमांक ४३/४ मंजूर करीत शासनाकडे वर्ग ३ व ४ संवर्गातील एकूण १९१२ पदे मंजुरीसाठी पाठविली होती. शासनाने २००३ साली १,१२४ पदांना मान्यता दिली. मात्र, त्यावेळी शासनाने आस्थापना खर्च जास्त होत असल्याचे कारण दाखवत ७८८ पदनिर्मितीच्या प्रस्तावास दुस-या टप्प्यात मान्यता देण्यात येईल, असे सांगितले होते. त्यातील २६८ दैनिक वेतनावरील कर्मचा-यांना कायम करण्यासाठी पदनिर्मितीचा फेरप्रस्ताव १९ आॅगस्ट २००४ रोजी शासनाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर २००६ ते २०१४ पर्यंत प्रत्येक वर्षी प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा केला.पदाधिकारी, कामगार संघटनांनीही शासन स्तरावर निवेदने देऊन विनंती केली. मात्र, आजपर्यंत हा प्रस्ताव शासन स्तरावर मंजूर करण्यात आलेला नाही. २६८ पैकी ६४ कर्मचारी मयत व सेवानिवृत्त झाले आहेत.बुधवारी पुन्हा एक अशासकीय प्रस्ताव सभागृहनेता विकास जैन, सभापती राजू वैद्य यांनी मांडला आहे. त्यास उपमहापौर विजय औताडे, राजू शिंदे, राजेंद्र जंजाळ, सीताराम सुरे, बापू घडमोडे, गजानन बारवाल यांनी अनुमोदन दिले आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEmployeeकर्मचारी