शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मालमत्ता विभागाचा मनपाच्या तिजोरीवरच डल्ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 16:36 IST

महापालिकेच्या तिजोरीत वैध मार्गाने निधी येऊ नये यासाठी या विभागातील अधिकारी व कर्मचारी काम करीत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमहापालिकेचा मालमत्ता विभाग तिजोरीवर अक्षरश: दरोडे टाकत आहे. . चिकलठाणा येथील आठवडी बाजाराची निविदा मागील वर्षी संपली

औरंगाबाद : महापालिकेचा मालमत्ता विभाग तिजोरीवर अक्षरश: दरोडे टाकत आहे. महापालिकेच्या तिजोरीत वैध मार्गाने निधी येऊ नये यासाठी या विभागातील अधिकारी व कर्मचारी काम करीत असल्याचे दिसून येत आहे. चिकलठाणा येथील आठवडी बाजाराची निविदा मागील वर्षी संपली. जानेवारी २०१८ मध्ये नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आता मंजुरीसाठी ही निविदा स्थायी समितीसमोर ठेवण्यात आली आहे. मागील १० महिन्यांपासून आठवडी बाजाराचे दरमहा एक लाख रुपये कोण जमा करीत होता हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मागील दहा महिन्यांचे दहा लाख रुपये कुठे गेले? यावरही प्रशासनाकडे उत्तर नाही.

चिकलठाणा येथे महापालिकेतर्फे आठवडी बाजार भरविण्यात येतो. मागील वर्षीच आठवडा बाजाराची निविदा संपली. महापालिकेने उशिराने नवीन निविदा काढली. जानेवारी २०१८ मध्ये लेखाधिकारी, मालमत्ता अधिकाऱ्यांनी मिळून निविदा उघडली. एकूण चार निविदा आल्या होत्या. त्यातील गिरधारे राजू राहुल यांनी २४ हजार ५०० रुपये देऊन ठेका घेण्याची तयारी दर्शविली. ही निविदा मंजुरीसाठी आॅक्टोबरमध्ये स्थायी समितीसमोर ठेवण्यात आली आहे. मागील दहा महिन्यांत अंतिम झालेली निविदा मंजुरीसाठी का ठेवली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

वरिष्ठांचे दुर्लक्षमहापालिकेचा मालमत्ता विभाग म्हणजे असंख्य घोटाळ्यांचे माहेरघर होय. वर्षानुवर्षे याठिकाणी ठाण मांडून बसलेले अधिकारी व कर्मचारी तिजोरीत कमी आणि स्वत:कडे जास्त महसूल कसा येईल, यावरच अधिक भर देत आहेत. शहरातील आठवडी बाजार, पार्किंग, दुकाने यामध्ये प्रचंड अनागोंदी सुरू आहे. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारीही याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधी