शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार तोफांचा आवाज बंद, प्रशासन अलर्ट; कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 14:34 IST

वैजापूर वगळता जिल्ह्यात सर्वत्र २ बॅलेट युनिट लागणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी ६ वा. थांबली. प्रचार तोफांचा आवाज बंद झाल्यानंतर आता पुढील ४८ तास प्रशासन अलर्ट मोडवर राहणार आहे. आज दुपारी मतदान केंद्रांकडे पूर्ण यंत्रणा रवाना झाली आहे. मतदान प्रक्रिया संपेपर्यंत जिल्ह्यात भरारी पथकांच्या गस्ती वाढविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

विधानसभा निवडणुकीसाठी ३९७ उमेदवारांनी अर्ज भरले होते. २१४ जणांनी माघार घेतली. १८३ उमेदवारांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल. २३ रोजी मतमोजणी होईल. वैजापूर वगळता जिल्ह्यात सर्वत्र २ बॅलेट युनिट लागणार आहेत. १९ रोजी सकाळच्या सत्रात यंत्रणेचे प्रशिक्षण झाल्यावर दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत सर्व कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना होतील. ४८ तासांत सोशल मीडियातील प्रचारावर पूर्णत: नजर असणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला पोलिस आयुक्त प्रवीण पवार, जि.प.सीईओ विकास मीना, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके आदींची उपस्थिती होती.

ईव्हीएम किती लागणार७४३० : बॅलेट युनिट३९१७ : कंट्रोल युनिट४३४३ : व्हीव्हीपॅट

जिल्ह्यात ३२७३ मतदान केंद्रशहरात : १२९०ग्रामीण भागात : १९८३शहरी मतदान केंद्र : ४२३ग्रामीण मतदान केंद्र : १२२९पोलिस आयुक्तालय हद्दीतील केंद्र : १२६१पोलिस अधीक्षक हद्दीतील केंद्र : २०१२संवेदनशील केंद्र : ४०

एकूण मतदार : ३२ लाख २७ हजार ५१पुरुष मतदार : १६ लाख ६३ हजार १८३महिला मतदार : १५ लाख ३९ हजार ४२१दिव्यांग मतदार : २७ हजार ९६४सेवा मतदार : २ हजार ५०८

वाहनांची व्यवस्थाकिती वाहने लागणार : १५९६एस.टी. बसेस किती : ३७४ऑटोरिक्षा : १५०

कर्मचारी किती लागणारपुरुष कर्मचारी : १० हजार ७९८महिला कर्मचारी : ७२००एकूण : १८ हजार १७८

शहरातील पोलिस यंत्रणा कितीपोलिस कर्मचारी : १८२३ / १२३ अधिकारी२६९३ : सीआरपीएफ कर्मचारीग्रामीण पोलिस यंत्रणा कितीपोलिस कर्मचारी : २२९१/ १३७ अधिकारी

गृहमतदान किती झाले?एकूण मतदान : ४७१४झालेले मतदान : ४ हजार ७१ (७९ टक्के)पोस्टल मतदान किती झालेएकूण मतदान : १३ हजार ३४१झालेले मतदान : ९६९९ (७३ टक्के)सैन्यदल मतदान : २२०८झालेले मतदान : १०आरोग्य यंत्रणेची व्यवस्थाएकूण कर्मचारी : ३१०३मेडिकल ऑफिसर : ३७१

दिव्यांगांसाठी काय तयारी१५१० केंद्रांवर व्हीलचेअर

पोलिस अधीक्षकांच्या हद्दीतील यंत्रणा अशीमतदारसंघ : ६मतदान केंद्र : १२४४पोलिस अंमलदार : २१४०होमगार्ड : १५००संवेदनशील केंद्र : २७

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर