शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

फटाका मार्केट सुरू होण्यापूर्वीच वादाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:29 IST

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या हद्दीत अयोध्यानगरी येथील गट नं. १९०, १९१ येथे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाका मार्केट भरविण्यात येणार असून, ...

ठळक मुद्देदोन वर्षांपूर्वी जळाले होते मार्केट : एकाच ठिकाणी दोन संघटनांची दुकाने

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या हद्दीत अयोध्यानगरी येथील गट नं. १९०, १९१ येथे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाका मार्केट भरविण्यात येणार असून, दुकाने थाटण्यावरून दोन संघटनांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. उत्सव व्यापारी असोसिएशन आणि जय महाराष्ट्र फटाका मार्केट यांच्यात अधिकृत आणि अनधिकृत या मुद्यावरून वाद पेटला आहे. नियमानुसार एकाच ठिकाणी दोन मार्केट भरविणे शक्य नाही. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी फटाका मार्केटवरून तक्रारी सुरू केल्या आहेत.२९ आॅक्टोबर २०१६ रोजी जि.प.मैदानावरील फटाका मार्केट जळून खाक झाले होते. १४० दुकानांची परवानगी असताना तेथे १८० दुकाने थाटण्यात आली होती. तसाच प्रकार अयोध्यानगरी येथील मार्केटमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्सव व्यापारी असोसिएशनने ५० दुकानांची परवानगी पुणे येथील छावणी विभागाकडून घेतली आहे. पुणे येथील छावणी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर ती जागा असोसिएशनला देण्यात आली आहे, तर जय महाराष्ट्र फटाका मार्केटची २५ दुकाने थाटण्यात येणार आहेत. त्यांनाही पूर्ण परवानगी देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.दोन्ही मार्केट अध्यक्षांचा दावा असाउत्सव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद खामगावकर यांनी सांगितले, गट नं.१९०, १९१ मधील १ एकर जागेत फटाका मार्केट उभारण्यासाठी छावणी परिषदेने आम्हाला परवानगी दिली आहे. ५० दुकानांना पोलीस, मनपा, पीडब्ल्यूडी, छावणी परवानगी मिळाली आहे. फायर ब्रिगेडची परवानगी बाकी आहे. आमची दुकाने नियमात असून अधिकृत आहेत. एकाच गटात दोन मार्केट असू शकत नाहीत.जय महाराष्ट्र फटाका असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ कुलकर्णी यांनी सांगितले, २५ दुकाने उभारण्यासाठी अधिकृतरीत्या परवानगी मिळाली आहे. नियमात बसून मार्केट उभारले जाईल. छावणीने गट नं. १९१ मध्ये आम्हाला जागा दिली आहे. उत्सव असोसिएशनला गट नं. १९० मध्ये त्यांना जागा दिलेली असताना गट नं. १९२ व ९३ मध्ये त्यांनी दुकाने लावल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला.परवाना नियम असा...३ मीटर अंतर दोन दुकानांमध्ये असणे आवश्यक आहे. रस्त्यापासून ९०० फुटावर दुकाने असावेत. १० बाय १० ची जागा एका दुकानाला असावी. अग्निशामक आणि पोलिसांचा परवाना मिळाल्यावरच फटाके विक्री करण्याचे दुकान थाटता येते. ना हरकत दाखला देताना अग्निशामक विभागातर्फे संबंधित व्यक्तीचे दुकान सुरक्षित ठिकाणी आहे का, याची तपासणी करूनच परवाने दिले जातात. दुकान हे आरसीसी बांधकाम आणि शटर असलेले असावे, पक्के बांधकामाचे दुकान नसेल तर मोकळ्या जागेत पत्र्यांच्या शेडमध्ये दुकान उभारावे, दुकानामध्ये आग विझविण्याचे उपकरण बसवावे, तसेच किराणा, इलेक्ट्रिक साहित्य, कपडे आणि स्फोटक रसायने असलेल्या दुकानांच्या शेजारी स्टॉल उभारू नये, अशा सूचना अग्निशामक विभागातर्फे देण्यात येतात. हे सगळे नियम पाळले आहेत की नाहीत. याची पाहणी करण्याची मागणी होत आहे.त्या घटनेला दोन वर्षे पूर्ण; मदत कागदावरचसरकार: तासाभराच्या आगीत झाले होते १० कोटींहून अधिक नुकसानऔरंगाबाद : जिल्हा परिषद मैदानावरील फटाका बाजारात २९ आॅक्टोबर रोजी झालेल्या अग्नितांडवात फटक्यांची १४० दुकाने आगीत खाक झाली होती. तसेच ११२ वाहनेही जळाली. यात एकूण १० कोटी ५८ लाख ३७ हजार ६७० रुपयांचे नुकसान झाल्याचा सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार करून शासनाकडे पाठविला. मंडप व वाहने मिळून १५ कोटींपर्यंतचे नुकसान झाले होेते. त्या प्रकरणात अद्याप काहीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. अग्निशामक विभागातर्फे जिल्हा परिषदेच्या साडेदहा एकर मैदानावर १८० फटाका विके्रत्यांना परवानगी दिली होती.औरंगाबाद फटाका असोसिएशनच्या भरवशावरच फटाक्यांचा बाजार भरला होता. त्या १०.५ एकरमध्ये दुकाने किती, पार्किंगची व्यवस्था कशी असेल. पाण्याचे टँकर,अग्निशमन बंबची व्यवस्था, दुर्घटना घडल्यास बाहेर पडण्यासाठी किती गेट असावेत. याचा कुठलाही नकाशा त्यावेळी तयार करण्यात आला नव्हता. मनपा अग्निशमन यंत्रणा, पोलीस विभागाने दुर्लक्ष केल्याने जि.प.मैदानावरील फटाका बाजार ‘रामभरोसे’च भरला होता.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfire crackerफटाके