शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकाचे हृदय धडधडले कामगार रुग्णात; अवयवदानामुळे मिळाले नवे आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 19:15 IST

शहरातील ४० वर्षीय कामगाराच्या हृदयाचे केवळ १५ टक्के पपिंग सुरू होते. त्यामुळे तातडीने हृदय प्रत्यारोपणाची गरज होती.

औरंगाबाद : ब्रेन डेड झालेल्या औरंगाबादेतील ३३ वर्षीय प्राध्यापक रुग्णाचे शनिवारी अवयवदान झाले. यात त्यांचे हृदय मुंबईतील रुग्णालयात प्रत्यारोपण झाले. विशेष म्हणजे या हृदयाचे औरंगाबादेतील ४० वर्षीय कामगारावर प्रत्यारोपण झाले आहे. प्राध्यापकामुळे या कामगाराला नवे आयुष्य मिळाले असून, औरंगाबादेतील व्यक्तीचे हृदय हे औरंगाबादेतील व्यक्तीलाच मिळाले आहे.

शहरातील ४० वर्षीय कामगाराच्या हृदयाचे केवळ १५ टक्के पपिंग सुरू होते. त्यामुळे तातडीने हृदय प्रत्यारोपणाची गरज होती. त्यासाठी ६ दिवसांपूर्वीच त्याला मुंबईला हलविण्यात आले होते. गंभीर प्रकृतीमुळे अवयवदानात हृदय मिळण्याच्या यादीत कामगाराला अग्रक्रम होता. कामगारासाठी ६ दिवस अत्यंत जोखमीचे होते. अखेर शनिवारी औरंगाबादेत ब्रेन डेड प्राध्यापकाचे अवयवदान झाले आणि कामगाराला हृदय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. औरंगाबादेतून चार्टर फ्लाईटने काही वेळात हृदय मुंबईत पोहोचले आणि त्याचे कामगारावर प्रत्यारोपण झाले. प्राध्यापकाचे हृदय मुंबईत धडधडले, तेही औरंगाबादेतील कामगार रुग्णावर. याविषयी रविवारी सकाळी माहिती समोर आली आणि अनेकांनी समाधान व्यक्त केले.

५ तास चालले प्रत्यारोपणहृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ही तब्बल ५ तास चालली. प्रत्यारोपणानंतर पहिले ५ दिवस हे अत्यंत नाजूक असतात. ५ दिवसांनंतर प्रत्यारोपण झालेल्या कामगाराची प्रकृती कशी आहे, हे स्पष्ट होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.

कामगारासाठी दाखविली बांधिलकीया कामगारावर माझ्याकडे उपचार सुरू होते. त्याच्या हृदयाचे केवळ १५ टक्के पपिंग सुरू होते. त्यामुळे तातडीने हृदय प्रत्यारोपणाची गरज होती. त्यामुळे अखेर त्याला हृदय मिळाले. औरंगाबादचे हृदय औरंगाबादच्या रुग्णाला मिळाले. हृदय शल्यविशारद डॉ. अन्वय मुळे यांनी हे प्रत्यारोपण केले. हा कामगार कार्यरत असलेल्या कंपनीने बांधिलकी दाखवित उपचार आणि प्रत्यारोपणासाठी संपूर्ण जबाबदारी उचलली.- डाॅ. अजित भागवत, हृदयरोगतज्ज्ञ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य