शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर येताच गुन्हेगाराची मिरवणूक; पोलिसांनी 'असा' केला पाहुणचार

By सुमित डोळे | Updated: August 17, 2024 19:59 IST

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सिल्लेखान्यातून त्याला ताब्यात घेतले. त्याचा येथेच्छ ‘पाहुणचार’ करून क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात दिले.

छत्रपती संभाजीनगर : खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या आरोपीची गावगुंडाच्या टोळक्याने चक्क कारवर बसवून मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांपर्यंत व्हिडीओ पोहोचल्यानंतर या गुंडाचा पोलिसांनी येथेच्छ ‘पाहुणचार’ केला. कारवर बसून मिरवलेला दादा थेट ठाण्यात गुडघ्यांवर येऊन माफी मागताना दिसला. अकीब ऊर्फ गोल्डन कुरेशी युनूस कुरेशी (२३, रा. सिल्लेखाना) असे आरोपीचे नाव आहे.

१६ जानेवारी २०२२ रोजी मिसारवाडीत हसन साजीद पटेल (२५) या तरुणाची १२ जणांनी मिळून तब्बल ५६ वार करून निर्घृण हत्या केली होती. सिडको पोलिसांनी अकीबसह १० आरोपींना अटक केली होती. तेव्हापासून अकीब जामिनासाठी प्रयत्न करत होता. जिल्हा सत्र न्यायालयासह उच्च न्यायालयाने देखील त्याला जामीन नाकारल्यानंतर त्याचे कुटुंब सर्वोच्च न्यायालयात गेले होते. तेथे त्याचा जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी सकाळी तो हर्सूल कारागृहाबाहेर आला. मात्र, सिल्लेखान्यात पोहोचताच २० ते २५ दुचाकी, चारचाकींसह त्याची मिरवणूक काढण्यात आली. एका कारवर अकीबसह ६ जण बसले होते. याचा व्हिडीओ तयार करून त्यांनी तो सोशल मीडियावर देखील पोस्ट केला.

क्रांती चौक ठाण्यात गुन्हाव्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सिल्लेखान्यातून त्याला ताब्यात घेतले. त्याचा येथेच्छ ‘पाहुणचार’ करून क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात दिले. अंमलदार इरफान खान यांच्या तक्रारीवरून अकीबसह जरार कुरेशी, शाहरुख कुरेशी, इरफान कुरेशी ऊर्फ सूर्या, अबरार कुरेशी यांच्यावर या मिरवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अकीबवर हत्येसह बेगमपुरा पोलिस ठाण्यात देखील एका गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी