शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षांत सोहळ्यानंतर पदव्यांची छपाई; विद्यापीठाकडून डिग्रीचे आऊटसोर्सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 12:52 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पहिल्यांदाच बाहेरील कंपनीकडून पदव्या छापून घेतल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देयावर्षी पहिल्यांदाच पदव्या बाहेरील कंपनीकडून छापून घेतल्या आहेत.या छपाई केलेल्या पदव्यांमध्येही अनेक चुका आढळून आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाकडे केल्या आहेत.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पहिल्यांदाच बाहेरील कंपनीकडून पदव्या छापून घेतल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी पदव्यांचा कागद बाहेरून विकत घेऊन पदव्यांची छपाई विद्यापीठातच केली जात होती.

महाविद्यालयांमध्ये पाठविण्यात येणाऱ्या पदव्या दीक्षांत सोहळ्यानंतर बुधवारी (दि.१६) विद्यापीठात दाखल झाल्या आहेत.विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यापूर्वीच सर्व अर्ज दाखल केलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पदव्यांची छपाई करण्यात येते; मात्र यावर्षी पहिल्यांदाच पदव्या बाहेरील कंपनीकडून छापून घेतल्या आहेत. या छपाई केलेल्या पदव्यांमध्येही अनेक चुका आढळून आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाकडे केल्या आहेत.

दीक्षांत सोहळ्यापूर्वी अर्ज भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पदव्यांची छपाई होणे आवश्यक असते; मात्र दीक्षांत सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी विद्यापीठाला कंपनीकडून पदव्या छापून मिळाल्या आहेत. यात महत्त्वाची बाब म्हणजे आजपर्यंत पदव्यांच्या सुरक्षेसाठी विद्यापीठातच त्याची छपाई केली जात असे; मात्र यावर्षी पदव्यांचा कागद बलण्यात आला असून, त्या कागदावर पदवी छापण्याची यंत्रणा विद्यापीठाकडे नसल्यामुळे बाहेरून पदव्या छापून घेण्यात आल्या असल्याचे समजते. विद्यापीठामध्ये प्रिंटिंग प्रेस आहे. याशिवाय परीक्षा विभागातही मोठमोठी यंत्रे असताना पदव्यांच्या छपाईची आऊटसोर्सिंग केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या पदव्या छपाईचे टेंडरही पुण्यातील एका कंपनीला दिल्याची माहिती समोर येत असून, परीक्षा विभागाची सर्वच कामे पुण्यातूनच होत असल्यामुळे त्याविषयी शंकाही उपस्थित करण्यात येत आहेत.

व्यवस्थापन परिषदेत विरोधविद्यापीठाच्या पदवीची छपाई करण्यापूर्वी कागद खरेदी आणि छपाई करण्याविषयीचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झाला होता. या बैठकीत अतिशय महागडा कागद खरेदी करण्याची सूचना प्रशासनाने केली होती. या खरेदीला व्यवस्थापन परिषदेच्या प्रभारी सदस्यांनी विरोध दर्शविला नाही. मात्र, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी महागड्या कागदाच्या खरेदीला विरोध दर्शविला. राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये ३० रुपयांपेक्षा अधिक खर्च पदवीसाठी येत नाही. मात्र, आपले विद्यापीठ ९० रूपये खर्च करण्याच्या तयारीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यानंतर हाच खर्च २७ रूपयांपर्यत खाली आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अधिक सुरक्षित असणारविद्यापीठाने यावर्षीपासून प्लास्टिक कोटेड नॉन टेरेबल आणि क्यूआर कोड, बारकोड असलेली पदवी विद्यार्थ्यांना दिली आहे. यात अनेक प्रकारच्या नवीन फिचर्सचा समावेश केला असून, त्यामुळे पदवी अधिक सुरक्षित असणार आहे. या कागदावर पदवी छापण्याचे यंत्र विद्यापीठाकडे नसल्यामुळे पदव्यांच्या छपाईचे आऊटसोर्सिंग केले, तसेच दीक्षांत सोहळ्यानंतरच पदव्या महाविद्यालयांना पाठविण्यात येणार होत्या. या पदव्या विद्यापीठाला प्राप्त झाल्या असून, गुरुवारपासून महाविद्यालयांकडे पाठविण्यात येतील.- डॉ. दिगंबर नेटके, संचालक, परीक्षा व मूल्यमापन

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीexamपरीक्षाMarathwadaमराठवाडा