जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात त्यांनी जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, आप्पासाहेब शिंदे, उपविभागीय अधिकारी (कन्नड) जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी (पैठण, फुलंब्री) स्वप्नील मोरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर, सिद्धार्थ धनजकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले की, मतदार माहितीची नोंदणी प्रक्रिया ही वेळोवेळी अद्ययावत करणे आवश्यक आहे. मतदार ओळखपत्रावरील मतदारांची नावे, वय, लिंग, फोटो इ. मध्ये विसंगती तसेच दुहेरी मतदार नोंदणी शोधून ते अद्यावत करणे, मृत्यू पावलेल्या मतदारांची नावे मतदान यादीतून वगळणे व इतर संबंधित कामे करताना मतदान नोंदणी अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन यादी निर्दोष करण्यास प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर सध्याच्या वाढत्या कोरोना संसर्गाच्या काळात योग्य खबरदारी घेत व काळजीपूर्वक काम करण्याची गरज आहे. देशपांडे यांनी मतदान नोंदणी अधिकारी व कर्मचारी यांना काम करतांना येणाऱ्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. डॉ. भारत कदम यांनी जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय मतदार नोंदणी छायाचित्र नसलेल्या मतदारांबाबतची कार्यवाही आदींसह निवडणूक विभागामार्फत करण्यात येत असलेल्या बाबींची माहिती दिली.