शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
3
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
4
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
5
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
6
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
7
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

नेव्ही ऑफिसर असल्याची बतावणी करून विवाह करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 1:15 PM

सिंगापूर येथे कार्यरत असल्याची विवाहविषयक वेबसाईटवर बतावणी करून उच्च शिक्षित तरुणीसोबत केला विवाह

ठळक मुद्देठाणे पोलिसांच्या एका पथकाने औरंगाबादेतून स्वप्नीलला अटक केली.सासू-सासरे आणि दीरही आरोपी

औरंगाबाद : मर्चंट नेव्हीमध्ये ऑफिसर असून, सध्या सिंगापूर येथे कार्यरत असल्याची विवाहविषयक वेबसाईटवर बतावणी करून उच्च शिक्षित तरुणीसोबत विवाह केल्यानंतर हुंड्यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या तरुणाला ठाणे पोलिसांनीऔरंगाबादेतूनअटक केली. फसवणूक झालेली तरुणी वकील असून, तिचे वडील निवृत्त न्यायाधीश आहेत.

स्वप्नील रवींद्र तेलगोटे (३१, रा. रामकृपा कॉलनी, प्रतापनगर), असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.  फसवणूक झालेल्या ठाण्यातील तरुणीने ठाण्यातील राबोडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने विवाहविषयक संकेतस्थळावरील स्वप्नीलचा बायोडाटा त्यांनी वाचला होता. त्यामध्ये स्वप्निलने एका कंपनीत सेकंड मेट मर्चंट नेव्ही ऑफिसर असल्याचे नमूद केले होते. त्याचा बायोडाटा वाचून पीडितेने त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याने त्याला आता सिंगापूर येथे मरीन पोर्ट पायलट म्हणून जॉब लागल्याचे सांगितले. स्वप्निलचे स्थळ पीडितेसह तिच्या नातेवाईकांना आवडल्याने त्यांचा २८ जानेवारी २०१८ रोजी साखरपुडा झाला आणि २९ एप्रिल रोजी ठाणे येथे विवाह झाला. लग्न ठरविताना २० लाख रुपये हुंडा मागितला होता; मात्र त्यानुसार दहा लाख रुपये लग्नापूर्वी द्या आणि उर्वरित दहा लाख रुपये नंतर द्या, असे स्वप्नीलच्या आई-वडिलांनी सांगितले. त्यानुसार दहा लाख रुपये रोख स्वरूपात हुंडा म्हणून आरोपीला दिला. 

लग्नामध्ये ४० तोळ्याचे दागिने पीडितेच्या अंगावर घालण्यात आले. लग्नानंतर पीडिता औरंगाबादेतील रामकृपा कॉलनीत राहण्यासाठी आली तेव्हा तिला मोलकरणीसारखी वागणूक दिली जाई. लग्नाला दोन महिने उलटल्यानंतरही आरोपी स्वप्नील घरीच असल्याने तिने त्याच्याकडे तुम्ही सिंगापूरला कधी जाणार आहात, अशी विचारणा केली असता स्वप्नीलने तिला मारहाण केली. तेव्हा तिने तुम्ही खरेच मर्चंट नेव्हीमध्ये कामाला आहात का, असे पुन्हा विचारल्यानंतर त्याने त्यास सिंगापूरहून आलेला एक ई-मेल पीडितेच्या मोबाईलवर पाठविला. तो ई-मेल वाचल्यानंतर पीडितेला कळले की, तो स्वप्नीलनेच स्वत: तयार करून पीडितेला पाठविला आहे. स्वप्नील आणि त्याचे आई-वडील आणि भावाने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यानंतर ती माहेरी निघून गेली. तिने याप्रकरणी राबोडी ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आणि ठाणे पोलिसांच्या एका पथकाने औरंगाबादेतून स्वप्नीलला अटक केली.

सासू-सासरे आणि दीरही आरोपीपीडितेच्या तक्रारीनुसार यात तिचा पती स्वप्नील, सासरा रवींद्र तेलगोटे, सासू आणि दीर यांनाही पोलिसांनी आरोपी केले. पोलिसांनी आरोपी स्वप्नीलला अटक केली असून, तो पोलीस कोठडीत आहे. महिला उपनिरीक्षक घाडगे तपास करीत आहेत.

टॅग्स :ArrestअटकdowryहुंडाAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस