शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
2
मुलींसाठी कमालीची आहे 'ही' स्कीम! केवळ व्याजातून होणार ₹४९ लाखांची कमाई, मॅच्युरिटीवर मिळतील ₹७२ लाखांचा फंड
3
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
4
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
5
"मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये", भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण
6
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
7
VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी
8
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
9
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
10
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
11
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
12
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
13
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
14
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
15
गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक, २ साथीदारांचा शोध सुरू
16
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
17
‘गंभीर’ बट्ट्याबोळ वेळीच आवरा! भारतीय क्रिकेटची अशी पत घालवणे जास्त भयंकर अन् अक्षम्य
18
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
19
पोकळ बडबड करून भाजप, मोदींशी कसे लढता येईल?; कातडीबचाव आघाड्या दूर साराव्या लागतील
20
सत्तेसाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम नाही; माजी राष्ट्राध्यक्षांना २७ वर्षांची शिक्षा, पण का?
Daily Top 2Weekly Top 5

परतुरातील उड्डाणपुलाचा आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:53 IST

परतूर : शहरात परतूर-आष्टी रोडवर होणाऱ्या उड्डाणपुलाचा आराखडा तयार झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शहरात परतूर-आष्टी रोडवर होणाऱ्या उड्डाणपुलाचा आराखडा तयार झाला आहे. प्रस्तावित आराखड्यानुसार शहरात येणारा रस्ता अंडरग्राऊंड राहणार आहे. त्यामुळे रेल्वे गेटवरील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. परतूर आष्टी रस्त्यावरील रेल्वे गेटवर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे या गेटवर रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले. गत चार वर्षांपासून या पुलाच्या कामाचा गोंधळ सुरू आहे. पुलासाठी सुरुवातीला तयार करण्यात आलेल्या आराखड्यामध्ये शहराकडून आष्टीकडे व रेल्वे स्टेशनकडून आष्टीकडे जाणारे दोन्ही मार्ग उड्डाण पुलाद्वारे जोडण्यात येणार होते. मात्र, शहराकडून आष्टीकडे जाणारा मार्ग उड्डाण पुलावरून घेतल्यास मुख्य रस्त्यावरील बाजारपेठ विस्कळीत होईल. त्यामुळे काही व्यापारी मंडळींनी पडद्याआड हालचाली करत उड्डाण पुलाचे डिझाईन बदलले. यातील एक मार्ग भुयारी करून घेतला. दरम्यान, या गोंधळात सदर पुलाचे काम रखडले. रेल्वे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनीही याकडे गांभिर्याने लक्ष दिले नाही. परिणामी, पुलाचे काम लांबले. येथील खडकाच्या दोनदा तपासण्या झाल्या. परंतु पुढे हालचाली झाल्या नाहीत. आता या पुलाचा आराखडा तयार झाला असून, त्यास प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामास कधी सुरुवात होते, याकडे परतूर वासियांचे लक्ष लागले आहे.उड्डाण पुलाच्या आराखड्यास मंजुरी मिळाली असून, अंदाजपत्रकाचे काम सुरू आहे. अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामास सुरुवात केली जाईल.एल.डी. देवकर, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग.