शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीची तयारी; उद्धव ठाकरे सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या जनसंवाद दौऱ्यावर

By बापू सोळुंके | Updated: February 10, 2024 19:29 IST

छत्रपती संभाजीनगर शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य विधानसभेसाठी एकत्रित संवाद सभा देखील होणार

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक तयारीच्या निमित्ताने जनसंवाद दौऱ्यावर येत आहेत. सोमवारी गंगापूर - खुलताबाद , वैजापूर, कन्नड- सोयगाव , छत्रपती संभाजीनगर पूर्व पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील सर्वाधिक आमदार शिंदे गटात आहेत. मात्र, मतदार निष्ठावंत असून ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचा दावा नेते करत आहेत. यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे जनसंवाद दौऱ्यातून मतदारापर्यंत जात आहेत. ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत,  शिवसेना नेते चंद्रकांत खैरे , विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन,  जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी,  राजेंद्र राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार असेल.

पाच आमदार शिंदे गटात गेल्याने शिवसैनिकांवर भिस्तजिल्ह्यातील सहापैकी पाच आमदार शिंदे गट शिवसेनेत गेल्यामुळे ठाकरे यांच्या पक्षाची सर्व भिस्त शिवसैनिकांवर आहे.आमदार सोडून गेले असले तरी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्यासोबत असल्याचा दावा सतत पक्षाच्या नेत्यांकडून केला जातो. पक्षाकडून लोकसभा उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा केली नाही. पक्षाकडून अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे इच्छुक आहे. असे असले तरी मातोश्रीने खैरे यांनाच आशीर्वाद देण्याचे संकेत दिल्याने खैरे कामाला लागल्याची चर्चा आहे.

असा असेल दौरा: शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव  बाळासाहेब ठाकरे यांचे सोमवारी, १२ रोजी सकाळी १० वाजता विमानाने संभाजीनगर शहरात आगमन होईल. दुपारी १२ वाजता गंगापूर येथे जनतेशी संवाद साधतील. त्यानंतर दुपारी २ वाजता वैजापूर विधानसभा मतदारसंघात संवाद साधतील. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता कन्नड येथे संवाद साधणार आहेत. रात्री ७:३० वाजता छत्रपती संभाजीनगर शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य विधानसभेतील एकत्रित संवाद सभेस ते मार्गदर्शन करणार आहेत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभा