शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती महिलेने घेतला गळफास, घातपाताच्या संशयाने माहेरच्या मंडळीचा सासरच्यांना चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 12:15 IST

वर्षभरा पूर्वीचा झाला होता विवाह; रुग्णालयात दोन्ही कुटुंब आमने-सामने आल्यानंतर त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली.

वाळूज महानगर : तीन महिन्याच्या गर्भवती महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.२८) सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. जयश्री रितेश पाटील (२५) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव असून, तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मृत जयश्री हिच्या माहेरच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात राडा करून तिच्या सासरच्या मंडळीस चोप दिला.

रितेश विकास पाटील (२८) हे बजाजनगरातील संजीवनी हाऊसिंग सोसायटीत पत्नी जयश्री, आई सुनीता पाटील, वडील विकास पाटील, मोठा भाऊ व वहिनी असे सर्वजण एकत्रित वास्तव्यास आहेत. वर्षभरापूर्वी २६ फेब्रुवारीला रितेश पाटील याचा जळगाव जिल्ह्यातील सोके, ता. पारोळा येथील जयश्री तुकाराम पाटील हिच्यासोबत विवाह झाला होता. या दोघांचा सुखाचा संसार सुरू असताना शनिवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास रितेशचे वडील मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. कुटुंबातील अन्य सदस्य घरातच झोपलेले होते. दरम्यान, सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास सुनीता पाटील या मुलगा रितेश पाटील याच्या रुममध्ये गेल्या तेव्हा त्यांना सुन जयश्री दिसून आली नाही. सुन घरात दिसत नसल्याने त्यांनी रितेशला झोपेतून उठवून जयश्री घरात दिसत नसल्याचे सांगितले. त्यावेळी ती बाथरुमला किंवा दुसऱ्या रुममध्ये गेली असेल, असे रितेश म्हणाला. त्यानंतर जयश्री पाटील यांनी दुसऱ्या रुमचा दरवाजा उघडला असता त्यांना जयश्री ही सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. पाटील कुटुंबीयांनी तिला बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तिला ८ वाजताच्या सुमारास मृत घोषित केले.

जयश्रीच्या नातेवाईकांचा घाटीत राडाजयश्री पाटील हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच माहेरीची मंडळी जळगाव येथून घाटीतील रुग्णालयात आले. यावेळी जयश्रीच्या माहेरच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करून तिच्या सासरच्या मंडळीसोबत वादावादी करण्यास सुरवात केली. दोन्ही कुटुंब आमने-सामने आल्यानंतर त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यावेळी घाटीतील सुरक्षारक्षक व पोलिसांनी मध्यस्थी करीत दोन्ही कुटुंबाची समजूत काढली. सायंकाळी बजाजनगर येथील स्मशानभूमीत जयश्री हिच्या पार्थिवावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास उपनिरीक्षक अशोक इंगोले हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद