शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

गरोदर महिला कर्मचार्‍यांना अतिरिक्त रजेची फक्त घोषणाच; पाच महिने उलटूनही परिपत्रक नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 13:53 IST

एसटी महामंडळातील महिला कर्मचार्‍यांना हक्काच्या प्रसूती रजेबरोबरच बाळाच्या संगोपनासाठी ३ महिने अतिरिक्त पगारी रजा देण्याची घोषणा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आॅगस्टमध्ये केली. परंतु पाच महिने उलटूनही प्रशासनाकडून परिपत्रक  निघाले नसल्यामुळे अतिरिक्त रजेची अंमलबजावणीच होत नाही. फक्त घोषणाच झाल्याने महिला कर्मचार्‍यांतून संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देएसटी महामंडळातील राज्यभरात काही महिला वाहकांचे अचानक गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने १४ जुलै रोजी समोर आणताच एकच खळबळ उडाली. महिला कर्मचार्‍यांना बाळाच्या संगोपनासाठी तीन महिने रजा देण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी जाहीर केला. 

- संतोष हिरेमठ औरंगाबाद : एसटी महामंडळातील महिला कर्मचार्‍यांना हक्काच्या प्रसूती रजेबरोबरच बाळाच्या संगोपनासाठी ३ महिने अतिरिक्त पगारी रजा देण्याची घोषणा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आॅगस्टमध्ये केली. परंतु पाच महिने उलटूनही प्रशासनाकडून परिपत्रक  निघाले नसल्यामुळे अतिरिक्त रजेची अंमलबजावणीच होत नाही. फक्त घोषणाच झाल्याने महिला कर्मचार्‍यांतून संताप व्यक्त होत आहे.

एसटी महामंडळातील राज्यभरात काही महिला वाहकांचे अचानक गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने १४ जुलै रोजी समोर आणताच एकच खळबळ उडाली. याविषयी तीव्र पडसाद उमटले. याविषयी ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केला. अखेर एसटी महामंडळातील हजारो महिला कर्मचार्‍यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सव काळातील सुरू असलेल्या फेर्‍यांचा आढावा घेण्यासाठी दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली आॅगस्टमध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात महिला कर्मचार्‍यांच्या प्रसूती रजेचा मुद्दा उपस्थित झाला. यावेळी महिला कर्मचार्‍यांना बाळाच्या संगोपनासाठी तीन महिने रजा देण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी जाहीर केला. 

सध्या महिला कर्मचार्‍यांना २६ आठवडे प्रसूती रजा दिली जाते. बहुतांश महिला मुलाच्या जन्मानंतर संगोपनासाठी ही रजा घेतात. काही महिलांना प्रसूतीपूर्व विश्रांतीची आवश्यकता असते. यामुळे नियमित रजेबरोबर अतिरिक्त तीन महिन्यांची रजा मंजूर करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली. या नव्या निर्णयामुळे यापुढे ही दुर्दैवी वेळ कोणावरही ओढावणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. परंतु पाच महिने उलटूनही या घोषणेची अंमलबजावणी होत नाही. याबाबत एसटी महामंडळाकडून परिपत्रकच काढण्यात आलेले नाही. यासंदर्भात संघटनांकडून यासंदर्भात महामंडळाला निवेदन देण्यात येत आहे. परंतु या निवेदनांना केराची टोपली दाखविली जात आहे. परिणामी गरोदर महिला कर्मचार्‍यांना होणारा त्रास काही केल्या कमी होत नाही.

नियमाप्रमाणे होईलअतिरिक्त रजा देण्यासंदर्भात काही अटी केल्या जातील. नियमाप्रमाणे ते होईल. एकदा झाले की ते कायमस्वरुपी होईल, असे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते म्हणाले.

त्वरित अंमलबजावणी व्हावीअतिरिक्त रजेची फक्त घोषणाच झाली. त्याचे परिपत्रक काढण्यात आले नाही. त्यामुळे कोणालाही घोषणेचा फायदा झाला नाही. घोषणेची त्वरित अंमलबजावणी झाली पाहिजे, असे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघटक शीला नाईकवाडे म्हणाल्या.

टॅग्स :Healthआरोग्यWomenमहिलाAurangabadऔरंगाबाद