शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

माहेरी निघालेल्या गर्भवतीची धावत्या रेल्वेतच झाली प्रसूती, प्रवासी महिलांनी केली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 19:32 IST

प्रवासी महिलांच्या मदतीमुळे बाळासह माता सुखरूप

लासूर स्टेशन : राज्यराणी एक्स्प्रेस नाशिकहून नांदेडकडे जात असताना या गाडीतून प्रवास करणाऱ्या एका महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. त्यानंतर सह प्रवासी महिलांच्या मदतीने ही महिला लासूर स्टेशन दरम्यान शनिवारी रात्री एक वाजता रेल्वेतच प्रसूत झाली असून, तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बाळासह मातेची प्रकृती ठणठणीत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवारी रात्री राज्यराणी एक्स्प्रेस नाशिकहून नांदेडकडे जात होती. या गाडीत एक व्यक्ती आपल्या पत्नीला माहेर असलेल्या सेलू येथे घेऊन जात होता. परंतु, रात्री रोटेगावपासून या गरोदर महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. लासूर स्टेशन परिसरात आल्यानंतर सदर महिला मदतीसाठी आक्रोश करू लागली. त्यानंतर सहप्रवासी महिला गरोदर महिलेच्या मदतीला धावून आल्या. सर्व पुरुष प्रवाशांना इतर डब्यात काढून देत महिलांनी प्रसूतीसाठी मदत केली. 

बाळासह माता सुखरूपअखेर रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ व महिला सुखरूप असून, छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर महिलेला पुढील उपचारांसाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आले. याकामी रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांच्यासह स्टेशन मास्तर सुनीलकुमार, पोलिस निरीक्षक शरदचंद्र जोगदंड, पोलिस उपनिरीक्षक गणेश दळवी, ठाणे अंमलदार वाल्मीक कदम, भाऊसाहेब खिल्लारे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, आकांशा पंडित यांनी मदत केली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरpregnant womanगर्भवती महिला