छत्रपती संभाजीनगर : जिल्हा सामान्य रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीदरम्यान आतड्यांना छिद्र पडल्याने मातेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
प्रियंका किरण गांगवे (२०,रा. विश्रांती नगर) असे या मयत मातेचे नाव आहे. हे असे याविषयी नातेवाईक अनिल बरसावणे यांनी सांगितले की, २ जून रोजी प्रियंका यांची जिल्हा सामान्य रुग्णालयात सिझेरियन प्रसूती झाली. त्यांना मुलगा झाला. प्रसूतीनंतर मात्र अचानक प्रियंका यांचे पोट फुगू लागले. ३ जून रोजी प्रियंका यांना घाटी रुग्णालयात रेफर करण्यात आले. तेथे दोन दिवस उपचार करण्यात आले. दरम्यान, शस्त्रक्रियाही करावी लागली. आतड्यांमध्ये छिद्र पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, उपचार सुरू असताना रविवारी रात्री प्रियंका यांनी अखेरचा श्वास घेतला.
शहरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्तीविवाहिता तसेच तिच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी सोमवारी दुपारी १२ वाजता तिच्या मृतदेहासह जिल्हा रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, असे नातेवाईकांनी सांगितले.