शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व तयारी : गोदाकाठच्या १,५७२ गावांसाठी यंत्रणा तयार ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 19:51 IST

मराठवाड्यातील सर्व प्रमुख विभागांच्या प्रमुखांची विभागीय आयुक्तालयात झाली बैठक  

औरंगाबाद : येणाऱ्या पावसाळ्यात नदीकाठच्या गावांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील गोदावरी  नदीकाठच्या १,५७२ गावांमध्ये प्राधान्याने विशेष नियंत्रण व्यवस्था तयार ठेवावी, असे आदेश मंगळवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व जिल्हा प्रशासनास दिले.  

ज्या गाव, वसाहतींमध्ये अतिपर्जन्यमानाची शक्यता आहे, गेल्या वर्षात ज्या-ज्याठिकाणी जास्त पाऊस झाला आहे, अशा सर्व ठिकाणांची गावे स्थलांतरासाठी पर्यायी व्यवस्था, शाळा, इतर सुरक्षित ठिकाणे तयार ठेवावी. त्याजागी पिण्याचे पाणी, जेवणाची योग्य व्यवस्था राहील, याची काळजी घेण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी, जि.प. सीईओंना त्यांनी सूचना केल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय मान्सून पूर्वतयारी बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली. जि.प.ने सर्व पाझर तलाव, नद्या, काठावरची गावे या सर्वांची प्रत्यक्ष पाहणी करून संरक्षणाचे उपाय करावेत. ज्याठिकाणी तलाव, धरणाच्या भिंती, दरवाजे, इतर बाबींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे, त्याठिकाणी तातडीने ती दुरुती कामे पूर्ण करून घ्यावीत. धोकादायक तलाव, पाझर तलाव, धरणांवर २४ तास देखरेख ठेवावी. महावितरणने विद्युत खांब, विद्युत प्रवाह करणाऱ्या तारा सुरक्षित आहेत का, पावसाच्या, वादळाच्या स्थितीत त्या धोकादायक बनणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. सा. बां. विभागाने सर्व पूल, रस्ते, इमारतींची पाहणी करावी, अस आदेश आयुक्तांनी दिले. मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जि.प. सीईओ यांच्यासह पीडब्ल्यूडी, महावितरण, आपत्ती व्यवस्थापन, कृषी, सिंचन, पाटबंधारे व इतर संबंधित यंत्रणांचे प्रमुख व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

खाम नदीपात्राची पाहणी कराखाम नदीपात्राची पाहणी करून आवश्यक असल्यास तेथील लोकांचे तात्पुरते सुरक्षित स्थलांतर प्राधान्याने करावे. पावसाच्या पाण्यात रस्ता, पूल वाहून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावावे, बीड जिल्ह्यात बिंदुसरा व इतर खोल पात्र असणाऱ्या नद्यांची पाहणी करून अति पर्जन्यमानात उद्भवणाऱ्या संकटांच्या व्यवस्थापणाची पूर्वतयारी ठेवावी. लाईफ जॅकीट, बोटी व इतर आनुषंगिक उपाययोजना सज्ज ठेवावी, असे आदेश बैठकीत देण्यात आले.  

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाgodavariगोदावरीAurangabadऔरंगाबाद