शुक्रवारी गणपूर्तीअभावी तहकूब झालेली संचालकांची विशेष सभा सोमवारी दुपारी २ वाजता संस्थेच्या सभागृहात झाली. सभेला १६ संचालक उपस्थित होते. सभापतिपदासाठी प्रकाश घुले व निर्मलाताई पवार आणि उपसभापतिपदासाठी बाळासाहेब जाधव व गोकुळसिंग राजपूत हे उमेदवार होते. गुप्त मतदानात सभापती व उपसभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत समसमान मते म्हणजे प्रत्येकी ८ मते मिळाली. त्यामुळे दोन्ही पदांच्या निवडीसाठी ईश्वर चिठ्ठीच्या पर्यायाचा वापर करण्यात आला. हम्माद खलील शेख (८) या मुलाच्या हस्ते ईश्वर चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यात सभापतिपदासाठी प्रकाश घुले व उपसभापतिपदी गोकुळसिंग राजपूत यांच्या नशिबाने कौल दिला. अध्याशी अधिकारी म्हणून व्ही. पी. रोडगे तर सहाय्यक म्हणून सहकार अधिकारी दीपक परदेशी, सचिव के. एम. वानखेडे यांनी काम पाहिले.
१६ संचालकांपैकी प्रकाश घुले, बाळासाहेब जाधव, शेख युसूफ, जिजाबाई झरेकर व सोनाली बोरसे हे भाजपचे किशोर पवार, काँग्रेसचे अशोक मगर, कैलास मनगटे हे सभागृहात हजर झाले. दुसऱ्या गटाने सभेस राजेंद्र मगर, पंडितराव वेताळ, गोकुळसिंग राजपूत, धनराज बेडवाल, भरत जाधव, बाबासाहेब मोहिते, दिलीप बनकर व निर्मलाबाई पवार हे ८ संचालक सभागृहात आले. २२ तारखेला विशेष सभेत प्रकाश घुले याांच्याकडे असलेले संख्याबळ एकनेे कमी झाल्याने समसमान मते पडली.
फाेटो : निवडून आलेले कृउबाचे सभापती व उपसभापती.