शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Prakash Ambedkar: 'नुरा कुस्ती खेळू नका, आखाड्यात या'; प्रकाश आंबेडकरांचे फडणवीसांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 20:34 IST

Prakash Ambedkar: 'भाजपला सरकार पाडण्याची गरज नाही, सरकार आपोआप पडेल.'

औरंगाबाद: आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन सरकारवर निशाणा साधला. आज शहरात वंचित आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटकची हिजाब गर्ल मुस्कान खान हिचा सत्कार सोहळा आयोजित केला होता, पण ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी या मुद्द्यासह राज्यातील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले.

ते म्हणाले की, सध्या राज्यात सध्या हिंदू-मुस्लमान राजकारण सुरू आहे. मुसलमानाची दाडी आणि हिंदूची शेंडी अशाप्रकारचे राज्यात राजकारण सुरू आहे. जनतेलाही अशाचप्रकारच्या राजकारणात रस आहे. दोष कोणाला देणार, निवडून गेले त्यांना की निवडून दिले त्यांना? मी निवडून दिले त्यांनाच दोष देतो. 

फडणवीसांना थेट आव्हान...सरकार पडण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, तसे संकेतही दिसत आहेत. भाजपला सरकार पाडण्याची गरज नाही, सरकार आपोआप पडेल. आजही नाना पटोले म्हणाले होते, आम्हाला सरकारसोबत जायचे नव्हते. देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखवून सरकारवर गंभीर आरोप केले. मी फडणवीसांना आव्हान देतो की, त्यांनी नुरा कुस्तीचे पैलवान होण्यापेक्षा आखाड्यातील पैलवान व्हावं. व्हिडिओचे पेनड्राइव्ह अध्यक्षांना देऊन काही उपयोग नाही. त्यांनी ते पेनड्राइव्ह जनतेच्या स्वाधिन करावेत, असे आंबेडकर म्हणाले.

संबंधित बातमी- 'औरंगाबाद पोलीस मुस्कानच्या घरी गेले अन्...', प्रकाश आंबेडकरांचा पोलीस आणि सरकारवर निशाणा

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबाद