लासुरगावात दवंडी प्रथा आजही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:07 AM2021-02-23T04:07:28+5:302021-02-23T04:07:28+5:30

आधुनिक युगात कोणताही संदेश समाज माध्यमातून एकमेकांपर्यंत सहज पोहचविण्यात येतो. पण जुन्या काळात एखादी बातमी किंवा घटनेची माहिती लोकापर्यंत ...

The practice of dawandi continues even today in Lasurgaon | लासुरगावात दवंडी प्रथा आजही कायम

लासुरगावात दवंडी प्रथा आजही कायम

googlenewsNext

आधुनिक युगात कोणताही संदेश समाज माध्यमातून एकमेकांपर्यंत सहज पोहचविण्यात येतो. पण जुन्या काळात एखादी बातमी किंवा घटनेची माहिती लोकापर्यंत पोहोचविण्यासाठी दवंडी देणे ही एक प्रभावी माध्यम समजले जात असे. गावातील प्रत्येक वाडीवस्तीवर, गल्लीतबोळात जाऊन त्याला दवंडी देण्याचे काम केले जाते. त्यानंतर सोशल मिडीया आला आणि क्षणार्धात माहिती लोकापर्यंत पोहचू लागली. मात्र, आधुनिक काळात देखील लासुरगाव येथे दवंडीची प्रथा कायम आहे. कोरोनाकाळात प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यासाठी दवंडी देऊन लोकांचे प्रबोधन करण्यात आले. त्याचबरोबर पोलिओ मोहीम, बिल वसुली, पीकविमा भरणा व शासकीय योजनांची जनजागृती केली जात असे. ग्रामपंचायतीच्या सभेबाबत गावात संदेश पोहचविला जात असे.

----

लासुरगाव येथील पंडीत ठोकळ अनेक वर्षांपासून दवंडी देण्याचे काम करतात. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. मात्र, दवंडी देण्याची प्रथा टिकून राहायची असेल तर त्यासाठी काम करणाऱ्या लोकांना आधार देणे गरजेचे आहे.

Web Title: The practice of dawandi continues even today in Lasurgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.