शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

वाळूजमध्ये लिंकरोड चौफुलीवर जिवघेणे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 18:41 IST

ए.एस.क्लबजवळील लिंकरोड चौफुलीवर खड्डे पडल्यामुळे या चौफुलीवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

वाळूज महानगर : ए.एस.क्लबजवळील लिंकरोड चौफुलीवर खड्डे पडल्यामुळे या चौफुलीवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या मार्गावरुन वाहनधारकांना जिव मुठीत धरुनच प्रवास करावा लागत आहेत.

महाराष्टÑ राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने ए.एस.क्लब ते पैठणरोडला जोडणाऱ्या या लिंकरोडचे काम चार-पाच वर्षांपूर्वी करण्यात आले. या लिंकरोडमुळे नगरनाका मार्गावरील अवजडवाहनांची वर्दळ कमी होऊन अपघातांच्या संख्येतही घट झाली होती. मात्र, अल्पवधीत या रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. या लिंकरोडवरील पुलाजवळ अनेक खड्डे पडले असून, हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे.

संबधित ठेकेदाराकडून मुदतीत या रस्त्याची दुरुस्ती करुन न घेण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी महाराष्टÑ राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही या लिंकरोड रस्त्याच्या दुरुस्ती करण्यासाठी पावले उचलली जात नसल्यामुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे.खड्ड्यांमुळे ट्रक उलटलामालवाहू वाहने खड्डयात आदळून पलटी होण्याच्या घटनाही घडत आहेत. अमरावतीहून वैजापूरकडे भुसा घेऊन जाणारा ट्रक (एम.एच.०४-जी.एच.१३२७) शनिवारी सकाळी चौफुलीवरील खड्डयात आदळून पलटी झाला. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक शाखेचे निरीक्षक मनोज पगारे व त्यांच्या सहकाºयांनी क्रेन मागवून ट्रक हटविण्यात आला.

वाहतूक शाखेच्या पत्रांना केराची टोपलीए.एस.क्लब ते पैठणरोडला जोडणाºया या लिंकरोची दुरुस्ती करावी, यासाठी वाहतूक शाखेने सार्वजनिक बांकाम विभाग, जागतिक बँक प्रकल्प, उद्योजक संघटना, सिडको प्रशासन व एमआयडीसीकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला. मात्र संबधित विभागांकडून रस्ता दुरुस्तीसाठी पावले उचलाी जात नसल्याची खंत वाहतूक शाखेचे निरीक्षक पगारे यांनी केली आहे. लिंकरोड चौफुलीवरील कमान एका बाजूने झुकली असून, ती केव्हाही कोसळण्याची भिती आहे. याच्या दुरुस्तीकडेही संबधित विभाग कानाडोळा करीत आहे.

दररोज होते वाहतुकीची कोंडीलिंकरोड चौफुलीवरील खड्डयात वाहने आदळून नादुरुस्त होतात. तसेच अवजडवाहनेही अनेकदा पलटी होत असल्याने या चौफुलीवर वाहतुकीची कोंडी होते. या चौफुलीवर अपघात घडल्यास नगररोड व लिंकरोडवरील वाहनांच्या रांगा लागतात. किमान या चौफुलीवरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेण्याची मागणी उद्योजक, वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :Potholeखड्डेWalujवाळूजAurangabadऔरंगाबाद