शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे आवडे सर्वांना; निविदा घेण्यास कंत्राटदार तयार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 19:40 IST

रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडून पॅचवर्क  करून घेतले जाईल

ठळक मुद्देपॅचवर्कसाठी विनंती करणारमनपानेच केले पथक विसर्जित

औरंगाबाद : पुढच्या महिन्यात म्हणजेच २ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी शहरातील खड्डे बुजविण्याचे मोठे आव्हान मनपासमोर आहे. मागील वर्षी मनपाने खड्डे बुजविण्यासाठी नऊ निविदा काढल्या होत्या. साडेचार कोटी रुपयांच्या निविदांकडे एकाही कंत्राटदाराने लक्ष दिले नाही. आता खड्डे बुजवायचे तरी कसे, असा प्रश्न मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना पडला आहे.

शहरात अद्याप एकही मोठा धोऽऽधो पाऊस झालेला नाही. मागील दीड महिन्यापासून रिमझिम सरी कोसळत ओहत. एवढ्याशा पावसामुळे शहरातील प्रमुख रस्ते खड्ड्यांत गेले आहेत. प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसून येत आहेत. खड्ड्यांमध्ये पावसाचे थोडेही पाणी साचले की खड्डा वाहनधारकाला दिसत नाही. त्यामुळे दररोज लहान मोठे अपघात होत आहेत. मनपा प्रशासन आणि सत्ताधारी मागील वर्षभरापासून १०० कोटींतील ३० रस्त्यांकडे लक्ष लावून बसले आहेत. त्यामुळे दुसऱ्या रस्त्यांकडे दुर्लक्ष झाले. दरवर्षी गौरी, गणपतीपूर्वी पॅचवर्क करण्यात येत असे. मागील वर्षी निधी नसल्याचे कारण दाखवून मुरुमाने खड्डे भरण्यात आले होते. दरम्यान, महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्तांना पत्र देऊन तात्पुरत्या स्वरुपात रस्त्यांवरील खड्डे बुजविणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. तसेच मुरूम आणि खडी टाकून बुजविण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र पथक कार्यान्वित करावे. या पथकात एक रोलर, एक टेम्पो आणि काही कर्मचाऱ्यांचा समावेश असावा, असेही पत्रात नमूद केले आहे.

पॅचवर्कसाठी विनंती करणारपावसामुळे जागोजागी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पॅचवर्कच्या कामाच्या प्रभागनिहाय ४५ ते ५० लाखांच्या निविदा मागविल्या होत्या. मात्र, पालिकेकडून वेळेवर बिले मिळत नसल्याने कंत्राटदारांनी या कामांकडे पाठ फिरविली आहे. एकाही कंत्राटदाराने निविदा भरलेली नाही. शंभर कोटी रुपयांची रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडून पॅचवर्क  करून घेतले जाईल, असे महापौरांनी सांगितले.

मनपानेच केले पथक विसर्जितकाही वर्षांपूर्वी रस्त्यांच्या पॅचवर्कसाठी पालिकेकडे स्वतंत्र पथक होते. या पथकात रोड रोलर, काही कर्मचारी, दोन टेम्पो यांचा समावेश होता. हे पथक बाराही महिने खड्डे बुजविण्याचे काम करायचे. परिणामी, खड्डा पडला की तो वेळीच बुजविला जायचा. कालांतराने प्रशासनाने हे पथक विसर्जित केले. साडेतीन वर्षांपूर्वी तत्कालीन प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हे पथक पुन्हा स्थापन करण्याचा प्रस्ताव सभेकडून मंजूर करून घेतला होता. तो आजपर्यंत कागदावरच आहे. याशिवाय मनपाने स्वत:चा डांबर प्लँट उभा करावा, असा आग्रह त्यांनी धरला होता. आयुक्तांच्या या कल्पनेला खो देण्यात डांबर लॉबी आघाडीवर होती.

टॅग्स :Potholeखड्डेAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाRainपाऊस