शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पोस्टाची जबरदस्त योजना, ३९९ रुपयांत १० लाखांचा विमा; किती जणांना मिळाला लाभ?

By साहेबराव हिवराळे | Updated: October 12, 2023 19:35 IST

पोस्टाची ही अपघात विमा काढण्यासाठी योजना असल्याने शासनाच्या या उपक्रमात अनेकांनी सहभाग घेण्यावर भर दिलेला आहे.

छत्रपती संभाजीनगर : भारतीय डाक विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या विमा योजनेत ३९९ रुपयांत १० लाखांचे विमा कवच दिले जाते. मराठवाड्यात १ लाख ५२ हजार ७३१ नागरिकांनी हा विमा उतरविला आहे. त्यात छत्रपती संभाजीनगरात २२८२३ नागरिकांनी वर्षभरात विमा घेतला आहे. शहरात ७४ जण विमादावा मिळण्याच्या प्रक्रियेत आहेत.

भारतीय डाक विभागाने सर्वसामान्यांना विमा कवच दिले आहे. अपघात झाल्यानंतर किंवा गंभीर जखमी झाल्यावर दवाखान्यात उपचारासाठी लागणारा खर्च करणे कठीण होऊन जाते. त्यामुळे टपाल कार्यालयाने ही योजना काढल्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळत आहे.

१० लाखांचा विमा३९९ च्या विमा हप्ता योजनेत विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर दोन मुलांना १ लाखापर्यंतची मदत मिळू शकते. तसेच अपघातानंतर दवाखान्यात जाण्यासाठी कुटुंबीयांना १० दिवसांपर्यंत प्रति दिवस १ हजार रुपये मिळतात. वाहतूक खर्च २५ हजार व मृत्यूनंतर ५ हजार अंत्यसंस्कारासाठी मिळतात. या योजनेची मुदत एक वर्ष असते. दरवर्षी नूतनीकरण करावे लागते.

२३ हजार जणांनी काढला विमापोस्टाची ही अपघात विमा काढण्यासाठी योजना असल्याने शासनाच्या या उपक्रमात अनेकांनी सहभाग घेण्यावर भर दिलेला आहे. छत्रपती संभाजीनगरात २२८२३ नागरिकांनी वर्षभरात विमा घेतला आहे.

या वर्षात कोटीपर्यंत भरपाईवर्षभरात ७४ जणांनी शहरात विमा काढलेला असून विभागात २४२ प्रकरणांचा निपटारा झाला तर ३७८ केसेस प्रक्रियेत आहेत. यातून कोटीपर्यंतही भरपाई जाऊ शकते.

विमा कसा काढाल?

पोस्ट ऑफिस अपघाती विमा योजनानागरिकांना १० लाख रु.पर्यंत अपघाती विमा संरक्षण देणे सुरू आहे. या उपक्रमात पात्रता भारतीय नागरिक आणि पोस्ट बँकेत खाते आवश्यक. योजनेसाठी हप्ता ३९९ रु. आणि २९९ रु. असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. टाटा आणि बजाज समूहाच्या काही नेटवर्क इस्पितळांमध्ये ‘कॅशलेस’ उपचारांची सुविधा केवळ ३९६ रुपयांत मिळू शकते. २९९ रुपयांच्या योजनेत तुलनेने फायदे थोडे कमी आहेत.

जनतेसाठी फायद्याचे कवच...पोस्टाने अनेक योजना सुरू केलेल्या असून, सामान्य नागरिक तसेच अधिकारीवर्गाचाही पोस्टावर अधिक विश्वास आहे. अगदी छोट्या रकमेत संरक्षण कवच देण्यात येते.- अशोक धनवडे, प्रवर डाक अधीक्षक

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसAurangabadऔरंगाबाद