शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

शिक्षकांच्या बदल्यांची शक्यता धूसर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:56 AM

गेल्या दहा दिवसांपासून शिक्षकांच्या बदलीबाबत राज्यस्तरीय आॅनलाइन बदल्यांच्या विभागाकडून कोणतीही सूचना प्राप्त नसल्यामुळे शिक्षणाधिका-यांसह जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्येही मोठी अस्वस्थता पसरली आहे

औरंगाबाद : गेल्या दहा दिवसांपासून शिक्षकांच्या बदलीबाबत राज्यस्तरीय आॅनलाइन बदल्यांच्या विभागाकडून कोणतीही सूचना प्राप्त नसल्यामुळे शिक्षणाधिका-यांसह जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्येही मोठी अस्वस्थता पसरली आहे. तथापि, जोपर्यंत संवर्ग-१ आणि संवर्ग-२ मध्ये मोडणाºया शिक्षकांच्या आॅनलाइन नोंदीची खातरजमा होत नाही, तोपर्यंत बदलीचे आदेश निर्गमित होणार नाहीत, असा पवित्रा राज्यस्तरीय बदली विभागाने घेतला आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात बदल्या होण्याची शक्यता फार कमी आहे.दरवर्षी साधारणपणे मेअखेरपर्यंत शिक्षकांच्या बदल्या होत असतात. यंदा ग्रामविकास विभागाने जिल्हास्तराऐवजी राज्यस्तरावरूनच शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्वतंत्र राज्यस्तरीय विभाग स्थापन करण्यात आला. या विभागाने यंदा पहिल्यांदाच शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या करण्यासाठी २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार संवर्गनिहाय नोंदी मागविल्या. जूनपासून संपूर्ण आॅक्टोबरपर्यंत शिक्षकांकडून आॅनलाइन नोंदणी करून घेतली. यासंदर्भात राज्यस्तरीय बदली विभागाकडून वारंवार तब्बल ११२३ सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बदलीपात्र यादीतील शिक्षकांपैकी मयत झालेले किंवा बदलीपात्र नसतानादेखील चुकीने काही शिक्षकांचा बदलीपात्र यादीत समावेश करण्यात आला आहे काय, याची जिल्हानिहाय खातरजमा करण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत राज्यस्तरीय बदली विभागाकडून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत.तथापि, राज्यस्तरीय बदली विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, संवर्ग-१मध्ये काही शिक्षकांनी गंभीर आजारी नसतानादेखील वैद्यकीय अधिकाºयांकडून आजाराचे खोटे प्रमाणपत्र मिळवून ते आॅनलाइन नोंदणीच्या वेळी जोडले आहे. याशिवाय अनेकांनी पती-पत्नी एकत्रीकरणाचा फायदा उचलण्यासाठी ३० किलोमीटरच्या आतमध्ये असलेल्या शाळांवर कार्यरत शिक्षकांनीही आॅनलाइन नोंदणी केलेली आहे. अशा शिक्षकांची तालुकानिहाय सखोल तपासणी केल्यानंतर खोट्या नोंदी करणाºया शिक्षकांना यादीतून वगळले जाईल. त्यानंतरच बदलींचे आदेश निर्गमित केले जाणार आहेत. परंतु राज्यस्तरीय बदली विभागाकडून अजूनपर्यंत तालुकानिहाय याद्यांच्या तपासणीचे आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेलेनाहीत.