शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

मध्यवर्ती बसस्थानकाच्या दुरवस्थेने प्रवासी संघटनांत संतापाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 18:58 IST

साध्या पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याने बसस्थानकाच्या दुरवस्थेने प्रवासी संघटनांतून संताप व्यक्त होत आहे. 

औरंगाबाद : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून एसटी महामंडळाला महिन्याकाठी ५ कोटींवर उत्पन्न मिळत आहे. तरीही बसस्थानकाच्या नूतनीकरणासह प्रवासी सुविधा देण्याकडे कानाडोळा केला जात आहे. साध्या पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याने बसस्थानकाच्या दुरवस्थेने प्रवासी संघटनांतून संताप व्यक्त होत आहे. 

मध्यवर्ती बसस्थानक आगाराच्या १४८ बस असून यातून दररोज १६ ते २० हजार प्रवाशांची वाहतूक होते. इतर विभागांच्या ये-जा करणाऱ्या बसेसचा आकडा दिवसभरात सातशेच्या घरात जातो. सप्टेंबर महिन्यात मध्यवर्ती बसस्थानकातून ५.६३ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. हा आकडा अनेकदा ६ कोटींवर जातो. एकीकडे महिन्याला कोट्यवधींचे उत्पन्न गोळा केले जात आहे, तर दुसरीकडे बसस्थानकाची दुरवस्था दूर करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचे दिसते. ज्यांच्यामुळे हे उत्पन्न मिळते, त्या प्रवाशांनाच मूलभूत सोयीसुविधाही दिल्या जात नाही.

स्थानकात आल्यावर बससाठी तासन्तास वाट पाहत बसणाऱ्या प्रवाशांसाठी थंडगार आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे हे मंडळाचे आद्यकर्तव्य आहे. पिण्याच्या पाण्याच्या जागी प्रचंड अस्वच्छता दिसून येते. त्यामुळे घाण पाणी पिऊन आजारी पडण्यापेक्षा प्रवासी खिशातील चार पैसे खर्च करून पाण्याच्या बाटल्या खरेदी करतात. कर्मचाऱ्यांवरही हीच वेळ येत आहे. त्यामुळे बाटलीबंद पाणी विकणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. बसस्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. 

सुधारणा करावीमहाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक मनीष जोगदंडे म्हणाले, एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. उत्पन्नही चांगले मिळते. तरीही मध्यवर्ती बसस्थानकाची अवस्था वाईट झालेली आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही; परंतु एसटी महामंडळाने बसस्थानकात सुधारणा केली पाहिजे.

छत कोसळण्याची भीतीमध्यवर्ती बसस्थानक बांधून अनेक वर्षे लोटली आहे. बसस्थानकाचे छत धोकादायक झाले आहे. हे छत कधीही कोसळू शकते,अशी माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी मुंबई कार्यालयास कळविली आहे; परंतु तरीही वेळीच खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली. वेळीच खबरदारी घेऊन बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम मार्गी लावण्याची गरज आहे. बसस्थानकाच्या उत्पन्नातून नूतनीकरण करावे,अशी मागणी होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Central Bus Standऔरंगाबाद मुख्य बसस्थानकstate transportएसटी