शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

प्रदूषण नियंत्रण मंडळ पथकाची घाटी रुग्णालयात पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 20:03 IST

‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी घाटीत पाहणी केली.

औरंगाबाद : घाटीत मूत्रपिंड विकार विभागाच्या परिसरात बायोमेडिकल वेस्ट साठविल्याने मोकाट कुत्र्यांच्या तोंडी मानवी मांसाचे गोळे लागत आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी घाटीत पाहणी केली. बायोमेडिकल वेस्टचे वर्गीकरण आणि साठवणुकीतील त्रुटींसंदर्भात दोन दिवसांत उत्तर देण्याची सूचना घाटी प्रशासनाला करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी राजेश औटी यांनी मूत्रपिंड विकार विभागाच्या शेजारी साठविण्यात येणाऱ्या बायोमेडिकल वेस्टची स्थिती पाहिली. याबरोबरच मेडिसिन विभागाच्या इमारतीसमोरील जुन्या वार्ड क्रमांक ८-९च्या पाठीमागे खड्डे करून कचरा पुरण्यात येणाऱ्या जागेचीही पाहणी केली.

यावेळी वॉटरग्रेस कंपनीचे अधिकारी वैभव बोरा, निवासी वैद्यकीय अधिकारी विकास राठोड उपस्थित होते. या दोन्ही जागेत बायोमेडिकल वेस्टचे वर्गीकरण, साठवणूक आणि विल्हेवाट योग्यरीत्या होत नसल्याचे निदर्शनास आले. बॉडी पार्ट असलेल्या पिशव्या उघड्यावरच ठेवल्या जातात. परिणामी तेथे मोकाट कुत्र्यांचा वावर वाढत आहे. त्यातूनच मांसाचे गोळे घेऊन कुत्रे घाटी परिसरात फिरल्याचे समोर आले. या सगळ्यांची नोंद घेण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दंडुक्यानंतर आता घाटीने कचरा वर्गीकरणासंदर्भात प्रशिक्षण आयोजित करण्याची तयारी दर्शविली आहे. 

घाटीत तिसऱ्यांदा पाहणीबायोमेडिकल वेस्टसंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तिसऱ्यांदा पाहणी केली आहे. घाटीत २०१६ पासून त्रुटी दूर झालेल्या नाहीत. उघड्यावर कचरा संकलन आणि एसटीपी प्लांट नाही, या मुख्य त्रुटी आहेत. परिणामी परिचारिका, कर्मचारी, डॉक्टर, रुग्ण, नातेवाईक या सर्वांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

दोघांना नोटीस बजावणारप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घाटीत पाहणी केली. घाटीसह नियमित कचरा उचलण्यासाठी वॉटरग्रेस कंपनीला नोटीस बजावली जाईल, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांनी सांगितले.

योग्य विल्हेवाटीसाठी प्रयत्न प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजन बिंदू यांनी पाहणीसाठी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. घाटीतील वॉर्डांमध्ये कचऱ्याचे योग्यरीत्या वर्गीकरण होईल, यासाठी प्राधान्य दिले जाईल. कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीसाठी प्रयत्न केले जातील, तसेच कचरा साठवणुकीसाठी अन्य जागा पाहिली जाईल. कर्मचाऱ्यांना कचरा वर्गीकरणासंदर्भात प्रशिक्षण दिले जाईल, असे डॉ. बिंदू यांनी सांगितले.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीpollutionप्रदूषणAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल