शहरातील व्ही.पी. कॉलेजमध्ये आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाला उपविभागीय उपजिल्हाधिकारी माणिक आहेर, ग्रामपंचायत निवडणूक निरीक्षक नामदेव केंद्रे, तहसीलदार राहुल गायकवाड, प्र.तहसीलदार निखिल धुळधर, नायब तहसीलदार दीपाली खेडेकर, महेंद्र गिरगे यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण प्रमुख धोंडिरामसिंह राजपूत यांनी १६०० कर्मचाऱ्यांना
प्रशिक्षण दिले. त्यांना प्र. गटशिक्षणाधिकारी मनीष
दिवेकर व एम. आर. गणवीर यांनी सहकार्य केले. उपजिल्हाधिकारी आहेर व तहसीलदार राहुल
गायकवाड यांनी यावेळी निवडणूक कामाचा आढावा घेऊन महत्त्वाच्या सूचना दिल्या. इव्हीएम, सिलिंग प्रक्रिया याबाबत राजपूत यांनी प्रात्यक्षिक दाखविले. उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना ट्रेनर आर. बी. देवरे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी दुशिंग, गवळी, गणेश चौकडे, संतोष जाधव, प्रवीण पंडित, ए.टी. पगारे यांनीही सहभाग
नोंदविला. तिसरे प्रशिक्षण १४ जानेवारी रोजी होणार
असून त्या दिवशीच मतदान पथक मतदान केंद्रांवर
रवाना होणार आहे.
फोटो कॅप्शन : प्रशिक्षण माहिती देताना उपजिल्हाधिकारी माणिक आहेर, निवडणूक निरीक्षक
नामदेव केंद्रे, तहसीलदार राहुल गायकवाड.