शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

क्रीडा विद्यापीठाचे राजकारण; पहिले पुणेकरांनी पळविले, आता दुसरे औरंगाबादेत उभारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 13:47 IST

sports university in aurangabad क्रीडा विद्यापीठ येथून हलविलेले नाही. येथील क्रीडा विद्यापीठ होणारच आहे.

ठळक मुद्देकरोडीत जास्तीचे भूसंपादन केल्यानंतर प्रस्ताव तयार करणार

औरंगाबाद: मराठवाड्यासह विदर्भ, खान्देशातील उत्तम क्रीडापटूंना दर्जेदार सरावासाठी औरंगाबादेतील करोडी परिसरातील गट नं. २४ येथील १७० एकर जागेवरील आंतरराष्ट्रीय दर्जाचे पहिले प्रस्तावित क्रीडा विद्यापीठ पुण्याने पळविल्यानंतर आता औरंगाबादमधे करोडीतच दुसरे क्रीडा विद्यापीठ बांधण्याचे आश्वासन देत, त्यासाठी जास्तीची जागा ताब्यात घेण्यात येईल, असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी स्पष्ट केले.

तत्कालीन क्रीडा आयुक्त तथा विद्यमान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी क्रीडा विद्यापीठासाठी १३ जिल्ह्यातील क्रीडापटूंची पंढरी म्हणून मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद शहर उदयास येईल, या हेतूने ६०६ कोटींचा तो प्रस्ताव २०१७ मध्ये तयार केला होता. २०११ मध्ये केंद्रेकर यांनी त्या जागेवरील १६९ प्रस्ताव रद्द केले. त्यामध्ये काँग्रेसच्या एका मातब्बर नेत्याच्या मेडिकल कॉलेजचा प्रस्तावही रद्द करून टाकला. त्यानंतर राज्यभरात क्रीडा विद्यापीठासाठी एवढी मोठी जागा कुठेही नसल्यामुळे करोडीतील जागा क्रीडा आयुक्तालयाने हेरली. तसेच पथकाने तेथे पाहणी करून ग्रीन सिग्नल दिले. मात्र गेल्या सरकारच्या राजकारणात ते विद्यापीठ रखडले, तर विद्यमान सरकारने पुणेकरांना विद्यापीठ भेट म्हणून दिले.५० ते ६० एकरमध्ये ते विद्यापीठ करण्याचा सुरूवातीचा प्रस्ताव होता, परंतु अलीकडच्या काळात स्पोर्टस म्हणजे केवळ मैदानी ‘खेळ’ राहिला नाही, त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड मिळालेली आहे. स्पोर्टस अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियानंतर क्रीडा विद्यापीठ ही मराठवाड्यातील सर्व स्तरातील खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याचे महाप्रवेशद्वार ठरू शकेल.

पालकमंत्री म्हणाले, पुण्यातील निर्णय योग्यचपालकमंत्री देसाई यांनी सांगितले, क्रीडा विद्यापीठ येथून हलविलेले नाही. येथील क्रीडा विद्यापीठ होणारच आहे. बालेवाडी पुणे येथील तयार सुविधांचा वापर म्हणून तेथे विद्यापीठाचा निर्णय झाला आहे. शासनाचा तो निर्णय योग्यच आहे. क्रीडा विद्यापीठ जिल्ह्यात व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मंजूर जागेत थोडी वाढ करण्याची गरज असून ती संपादित केली जाईल.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईState Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबादPuneपुणे