शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय अनास्थेचा मराठवाड्याला फटका, अवघ्या ८१ कि.मी. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 12:52 IST

दक्षिण मध्य रेल्वेकडून मनमाड-औरंगाबाद-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे; परंतु वर्षानुवर्षे हा प्रस्ताव कागदावरच आहे.

ठळक मुद्देमाहिती अधिकारातून बाब समोर नांदेड विभागात ८९३ कि.मी.चा रेल्वे मार्ग

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : राजकीय अनास्थेचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील रेल्वे विकासाला बसत आहे. वर्षानुवर्षे रेल्वे प्रकल्प कागदावरच आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात तब्बल ८९३ कि. मी.चा रेल्वे मार्ग आहे; परंतु यात केवळ ८१.८५० कि.मी. मार्गाचे दुहेरीकरण झाले आहे, तर फक्त ३७ कि.मी. विद्युतीकरण झाले आहे. माहिती अधिकारातून ही धक्कादायक माहिती पुढे आली असून, मराठवाड्यातील खासदारांनी आतातरी जागे व्हावे, अशी अपेक्षा रेल्वे संघटनांकडून व्यक्त होत आहे.

दक्षिण मध्य रेल्वेकडून मनमाड-औरंगाबाद-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे; परंतु वर्षानुवर्षे हा प्रस्ताव कागदावरच आहे. दुहेरीकरणाचा हा प्रस्तावही थंडबस्त्यात गेला आहे. या प्रस्तावाला कधी मंजुरी मिळते, याकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागलेले असताना सध्या तरी त्याला रेल्वे बोर्डाकडून प्राधान्य नसल्याचेही माहिती अधिकारातून पुढे आले आहे. मनमाड-परभणी हा २९१ कि.मी.चा मार्ग आहे. यासाठी तीन वर्षांपूर्वी २ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही प्रस्तावाला मंजुरीच मिळालेली नाही. त्यामुळे हा खर्चही वाढल्याची शक्यता आहे. एकेरी रुळावरून क्षमतेपेक्षा अधिक रेल्वे धावतात. त्याची रेल्वे प्रशासनाला कल्पना आहे. एकेरी मार्गावर इंजिन नादुरुस्त झाले तर संपूर्ण वाहतूकच विस्कळीत होते, तरीही दुहेरीकरणाचा प्रस्ताव मार्गी लागत नसल्याची स्थिती आहे. राजकीय पाठपुरावा कमी पडत असल्याची ही परिस्थिती ओढावत असल्याची ओरड होत आहे.

खासदारांनी जागे व्हावेमाहिती अधिकारात दुहेरीकरण, विद्युतीकरणाची माहिती मागितली होती. तेव्हा नांदेड विभागात ८९३ कि.मी. पैकी केवळ ८१ कि.मी. मार्गाचे दुहेरीकरण आणि ३७ कि.मी. मार्गाचे विद्युतीकरण झाल्याची माहिती मिळाली. दक्षिण मध्य रेल्वेच्या अन्य विभागांत पूर्ण विद्युतीकरण, दुहेरीकरण झाले आहे. मराठवाड्यावरच अन्याय होत आहे. मराठवाड्यातील खासदारांनी आता तरी जागे झाले पाहिजे.- गौतम नाहाटा, अध्यक्ष, नमो रेल्वे संघटना

पुढील अर्थसंकल्पात दुहेरीकरणमनमाड-परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पुढील म्हणजे २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात घेतले जाईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे. विद्युतीकरणाला मंजुरी मिळाली आहे. निविदाही पूर्ण झाली आहे. रेल्वेमंत्र्यांची वेळ घेऊन लवकरच विद्युतीकरणाचे भूमिपूजन केले जाईल.- खा. डाॅ. भागवत कराड

टॅग्स :Marathwadaमराठवाडाrailwayरेल्वेAurangabadऔरंगाबाद