शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ; कंटाळून तक्रारदारानेच केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 15:26 IST

दोन मुलींचा विवाह केल्यापासून तक्रारदार आर्थिक अडचणीत होते.

ठळक मुद्देकर्जाच्या आमिषाने ४ लाख घेऊन गंडवले पोलिसांचा निष्काळजीपणा; नातेवाईकांचा आरोप 

औरंगाबाद : २५ लाख रुपये कर्ज काढून देण्याच्या आमिषाने ४ लाख २० हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्याविरुद्ध तक्रार करून महिनाभरानंतरही पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे हताश झालेल्या तक्रारदाराने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना पदमपुरा येथे मंगळवारी सकाळी समोर आली. वेदांतनगर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला. 

सुरेश शेकूजी पाटील (५२, रा. सुयोग कॉलनी, पदमपुरा) असे मृताचे नाव आहे, तर संजय गोविंदराव साबळे (रा. शिवराई, ता. गंगापूर) आणि त्याचा पुतण्या प्रफुल्ल नंदू साबळे (रा. भवानीनगर), अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. मृत पाटील हे डिजिटल बॅनर जाहिरात करणाऱ्या खाजगी कंपनीत  व्यवस्थापक होते.  दोन मुलींचा विवाह केल्यापासून पाटील आर्थिक अडचणीत होते. आरोपी संजय साबळे एकदा पाटील यांच्या घरी आला व त्याचे भाऊजी शिर्डीतील  बँकेचे  संचालक असून, २५ लाख रुपये कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी ५  लाख रुपये खर्च येईल, असेही त्याने सांगितले. पाटील यांनी  तयारी दर्शविताच आरोपीने २ कोरे धनादेश, २  फोटो, आधार कार्ड आणि  पॅन कार्ड घेतले. 

साबळेने त्यांच्याकडून १ लाख ५५ हजार रुपये नेले. तो  पैसे नेण्यासाठी त्याचा पुतण्या प्रफुल्ल यास पाठवीत असे. पाटील यांनी क्रेडिट कार्डमधील ६२ हजार रुपये दिले. गुगल-पे, फोन-पेद्वारे १  लाख ५३ हजार रुपये आणि  ५० हजार रुपये रोखीने दिले; पण कर्ज मंजूर झाले नाही.  यामुळे पाटील यांनी पैसे परत मागितले. शेवटी त्यांनी छावणी विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयात  दि.७ आॅगस्टला  आणि वेदांतनगर ठाण्यातही  अर्ज दिला. 

विष प्राशन करून संपविले जीवनपाटील यांचा अर्ज हवालदार तडवी यांच्याकडे चौकशीसाठी होता.  पोलिसांनीही अर्जानुसार आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविला नाही. यामुळे पाटील यांनी सोमवारी (दि.१४) बाथरूममध्ये विष पिले. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांचा निष्काळजीपणा; नातेवाईकांचा आरोप वेदांतनगर पोलिसांनी तडकाफडकी कारवाई केली असती तर पाटील आज जिवंत असते. मात्र, पोलिसांनी त्यांच्या अर्जाबाबत निष्काळजीपणा दाखविल्याचा आरोप पाटील यांचे भाऊ विलास पाटील यांनी केला. 

मरण पावल्यावर पाठविली एमएलसीपाटील यांना घाटीत दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या घटनेची माहिती (एमएलसी) तातडीने पोलिसांना दिली नाही. त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांनी पोलिसांना कळविले. यामुळे त्यांचा मृत्यूपूर्व जबाब पोलिसांना नोंदविता आला नाही. 

मृत्यूनंतर नोंदविला गुन्हा तक्रारदाराचा मृत्यू झाल्याचे समजताच आरोपी संजय साबळे आणि प्रफुल्ल विरुद्ध मृताच्या मुलाची तक्रार नोंदवून घेत गुन्हा नोंदविला.