शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कमलेश पटेल यांच्या मारेकऱ्याचे रेखाचित्र पोलिसांनी केले तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 18:47 IST

या रेखाचित्राच्या आधारे पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत. 

ठळक मुद्देगुलमंडीवरील खून प्रकरण अकरा दिवसांनंतरही उलगडा होईना

औरंगाबाद : कुरिअर कंपनीचा व्यवस्थापक कमलेश ऊर्फ प्रकाश जसवंत पटेल (रा. नगारखाना गल्ली, गुलमंडी) यांच्या चारपैकी एका मारेकऱ्याच्या वर्णनाच्या आधारे सिटीचौक पोलिसांनी त्याचे रेखाचित्र तयार केले आहे. या रेखाचित्राच्या आधारे पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत. 

गुलमंडीतील नगारखाना गल्लीतील रामा-मोहन कुरिअर कंपनीचे  व्यवस्थापक कमलेश पटेल यांचा दि.३१ जानेवारी रोजी भरदुपारी झालेल्या  खुनाचा सिटीचौक पोलीस ठाण्यातील तीन आणि गुन्हे शाखेची तीन पथके तपास करीत आहेत. खून करून पळालेल्या मारेकऱ्यांनी  रुमाल बांधून त्यांचे चेहरे झाकले होते. घटनास्थळावरून पळाल्यानंतर पोलिसांनी विविध रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. शिवाय मोबाईल कॉलच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला. घटना होऊन ११ दिवस उलटल्यानंतर पोलिसांना एका संशयिताचे वर्णन मिळाले. या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी संशयिताचे रेखाचित्र तयार के ल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. 

ते म्हणाले, आम्ही तयार केलेले रेखाचित्र हे आरोपीच्या चेहऱ्याशी मिळते-जुळते आहे. यामुळे या वर्णनाचा तरुण कुठेही आढळल्यास सिटीचौक पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. एका दुचाकीने ट्रीपल सीट पसार झालेले आरोपी नंतर दोन वेगवेगळ्या मोटारसायकलने वेगवेगळ्या दिशेने गेल्याचे तपासात समोर आले. यापैकी एका मोटारसायकलने दोन जण जळगाव रोडने गेल्याचे स्पष्ट झाले. 

रेखाचित्राच्या आधारे मारेकऱ्याचा शोधहे रेखाचित्र राज्यातील विविध जिल्ह्यांतील पोलिसांना आणि अन्य राज्यांनाही पाठविले जाणार आहे. कमलेश पटेल यांच्या मारेकऱ्यांना आम्ही लवकरच पकडू, असा विश्वास पोलीस निरीक्षक पवार यांनी दर्शविला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस