शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

एकीकडे पोलिसांची गस्त; तर दुसरीकडे मोंढ्यात फोडली दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 19:41 IST

रात्रभर डोळ्यात तेल घालून पहारा असला तरी चोरट्यांचा धुमाकूळ

ठळक मुद्देपोलिसांच्या नाकावर टिच्चून 

औरंगाबाद : समाजकंटकांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांनी रात्रभर गस्त सुरू केली खरी; पण चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून बुधवारी रात्री जुन्या मोंढ्यातील तीन दुकाने फोडली. याशिवाय रात्रीच्या नाकाबंदीच्या काळातच दोन दिवसांत चोरट्यांनी वेगवेगळ्या भागांतून दोन कारसह सहा वाहने पळविली. 

पोलिसांच्या खड्या पाहऱ्याला न जुमानता चोरट्यांनी बुधवारी रात्री जुन्या मोंढ्यातील तीन दुकाने फोडल्याचे समोर आले. एन-३ सिडको येथील रहिवासी महेंद्र बंब यांचे जुना मोंढा येथील दीप ट्रेडर्स नावाचे दुकान रात्री २ वाजेनंतर फोडण्यात आले. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील चिल्लर, १७ हजारांची रोकड, काजू, बदाम, विलायची व पिस्ता, असा सुमारे दीड लाख रुपयांच्या वस्तू, तसेच मोबाईल फोन पळविला. या दुकानाशेजारी अंबिका ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. या दुकानाचे शटर चोरट्यांनी फोडले. मात्र, दुकानात काहीच नसल्याने चोरटे रिकाम्या हाताने त्या दुकानातून बाहेर आले. नंतर चोरट्यांनी तेथील बाबूभाई बारदाना नावाचे दुकान फोडले. या दुकानातही चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. गुरुवारी पहाटे ७.३० वाजेच्या सुमारास मोंढ्यात काम करणाऱ्या लोकांनी या घटनेची माहिती दुकानदार बंब यांना कळवली. यानंतर बंब हे दुकानात गेले असता शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि दुकानातील सामान अस्ताव्यस्त करीत त्यांनी चोरी केल्याचे त्यांना दिसले. सहायक पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

पोलिसांवर नामुष्कीची वेळसमाजकंटकांना रोखण्यासाठी शहराचे अख्खे पोलीस दलच सक्रिय झाले आहे. रात्री ९ वाजेपासून शहरात नाकाबंदी सुरू केली आहे. शिवाय रात्रभर गस्तही वाढविण्यात आली आहे. प्रत्येक ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही रात्रपाळीची गस्त देण्यात आली. शहरभर पोलीस फिरत असताना मोंढ्यात बुधवारी रात्री चोरीची घटना घडल्याने पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान उभे राहिले आहे. 

बिनधास्त चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैददीप ट्रेडर्समध्ये चार सीसीटीव्ही कॅ मेरे आहेत. या कॅमेऱ्यांत चार चोरटे कैद झाले. रिक्षाने आलेल्या चोरट्यांनी लोखंडी टॉमीने दुकानाचे शटर उचकटवले, तसेच त्यांच्यापैकी एक जण दुकानात गेला. दुकानात चोरी करतानाचे चोरट्यांचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले. 

स्टेशन रोड आणि सिडकोतून पळविली कारसिडको एन-६ मधील संभाजी कॉलनीत राहणारे विलास श्रीकि शन डाखोरकर यांनी त्यांच्या मालकीची दहा लाखांची कार (क्रमांक एमएच-२० ईवाय ३७३७) सिडको एन-७ येथे १८ जुलै रोजी उभी केली होती. ही कार चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार समजल्यानंतर विलास यांनी २४ जुलै रोजी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली. अन्य एका घटनेत हॉटेलचालक दलजितसिंग ग्यानसिंग महाजन यांच्या मालकीची चार लाखांची कार (क्रमांक एमएच-२० डीजे ६०२५) चोरट्यांनी लंपास केली. ही घटना २३ जुलै रोजी रात्री शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर घडली. दुसऱ्या दिवशी दलजितसिंग यांना हा प्रकार समोर येताच, त्यांनी उस्मानपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. हवालदार  नरवाडे हे तपास करीत आहेत.

बायजीपुऱ्यातून पळविली मोटारसायकल बायजीपुरा परिसरातील इंदिरानगर येथे घरासमोर उभी केलेली मोटारसायकल (क्रमांक एमएच-२० ईए ९१४९) चोरट्यांनी २२ जुलै रोजी रात्री चोरून नेली. याविषयी संदीपअप्पा साहेब बांड यांनी जिन्सी ठाण्यात तक्रार नोंदविली.उस्मानपुरा येथील विनोद झंवर यांच्या मालकीची मोटारसायकल (क्रमांक एमएच-२० एयू ५१६६) चोरट्यांनी १८ जुलै रोजी चोरून नेली. याविषयी त्यांनी एमआयडीसी वाळूज ठाण्यात तक्रार नोंदविली. अन्य एका घटनेत औरंगपुरा भाजीमंडईसमोर उभी केलेली दुचाकी (क्रमांक एमएच-२० ईएन ८६५४) चोरट्यांनी १८ रोजी चोरून नेली. याविषयी चंद्रकला रमेश केवट (रा. न्यू हनुमाननगर) यांनी सिटीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. कर्णपुरा येथील वॉकिंग प्लाझा येथे उभी केलेली मोटारसायकल (क्रमांक एमएच-२० सीएल ०३९०) चोरट्यांनी लंपास केली. १९ रोजी भरदिवसा ही चोरी झाली. महेश दादाभाई पटेल यांनी छावणी ठाण्यात तक्रार दिली.  

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी