शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पतीपीडित तक्रारदार महिलेला पोलीस निरीक्षकाचे आक्षेपार्ह मेसेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 15:43 IST

पोलीस आयुक्तांकडून तक्रारीची गंभीर दखल, कसून चौकशी करणार

औरंगाबाद : पतीविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेचा मोबाईल नंबर घेतल्यानंतर तिच्या मोबाईलवर पोलीस निरीक्षकांनीच वारंवार आक्षेपार्ह मेसेज पाठविल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी रात्री समोर आला. ‘घाणेरडे मेसेज पाठवू नका’, असे सांगून महिलेने निरीक्षकाला व्हॉटस्अ‍ॅपवर ब्लॉक केले; मात्र त्यानंतरही त्यांनी गुरुवारी सकाळी टेक्स्ट मेसेज पाठविल्याने संतप्त महिलेने निरीक्षकांविरुद्ध पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच, पोलीस निरीक्षक आजारी रजा टाकून ठाण्यातून गायब झाले.

हेमंत गिरमे, असे पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. परिसरातील एक विवाहिता घरगुती कारणावरून पतीविरुद्ध तक्रार देण्यासाठी काही दिवसांपूर्वी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गेली होती. ठाण्याचे पोलीस निरीक्षक गिरमे यांची त्यांनी भेट घेऊन तक्रारीचे स्वरूप सांगितले. पो. नि. गिरमे यांनी महिलेचा मोबाईल आणि तिच्या पतीचा मोबाईल नंबर घेतला होता. पतीला बोलावून समज देतो, तुम्हाला यापुढे तो त्रास देणार नाही, अशी ग्वाही गिरमे यांनी दिली होती.

बाळ घरी असल्याने त्या विवाहितेला लगेच घरी जावे लागले होते. नंतर पोलीस निरीक्षक गिरमे यांनी महिलेला फोन करून तक्रारीसंबंधी काही छायाचित्रे असतील तर त्यांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर पाठविण्यास सांगितले. त्यानुसार पुरावा म्हणून महिलेने काही छायाचित्रे गिरमे यांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर पाठविली होती. त्यानंतर गिरमे यांच्याकडून महिलेला सतत मेसेज येण्यास सुरुवात झाली. महिलेने गिरमे यांना फोन करून मेसेज पाठवू नका, असे स्पष्ट बजावले. यानंतरही गिरमे यांनी महिलेच्या व्हॉटस्अ‍ॅपवर आक्षेपार्ह मेसेज पाठविणे सुरूच ठेवले. एवढेच नव्हे, तर ते व्हिडिओ कॉल करू लागले. यामुळे महिलेने त्यांचा नंबर व्हॉट्सअ‍ॅपला ब्लॉक केला. व्हॉटस्अ‍ॅपवर ब्लॉक केल्यापासून गिरमे यांचे मेसेज येणे बंद झाले होते.

दरम्यान, ४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास गिरमे यांनी महिलेच्या मोबाईलवर आक्षेपार्ह टेक्स मेसेज पाठविला. हा मेसेज वाचल्यानंतर महिलेने तिच्या पतीला गिरमेकडून होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. संतप्त महिलेने पतीसह जवाहरनगर पोलीस ठाण्यात गिरमेविरोधात तक्रार करण्यासाठी धाव घेतली; मात्र गिरमे पोलीस ठाण्यात आले नव्हते. 

महिलेची तक्रार प्राप्त, चौकशी सुरू -पोलीस आयुक्तगिरमे यांनी मोबाईलवर आक्षेपार्ह मेसेज पाठविल्याची तक्रार महिलेने नोंदविली आहे. मेसेजचे स्वरूप पाहून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवायचा; अथवा खात्यांतर्गत कारवाई करायची, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. महिलेला आम्ही बोलावून घेत, त्यांची तक्रार जाणून घेतल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले. गिरमे हे आजारी रजेवर गेले आहेत. महिलेच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांना दिल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMolestationविनयभंगMobileमोबाइल