शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी पुण्यातून प्रेमी युगुलास परत आणले; सहाव्या दिवशी युवकाने आयुष्य संपवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 19:10 IST

पोलीस ठाण्यात दोघांनीही आपापल्या घरी जाण्याचे स्वेच्छेने सांगितले होते. 

ठळक मुद्देचार जणांविरुद्ध गुन्हा

पैठण : शहरातील २० वर्षीय युवकाने रविवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सहा दिवसांपूर्वीच पोलिसांनी प्रेयसीसह या युवकास चाकण (जि. पुणे) येथून परत आणले होते. दरम्यान, युवकाच्या आत्महत्येप्रकरणी प्रेयसीच्या आईसह चार जणांविरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

अजय राजू दाभाडे (२०, रा. नवीन कावसान) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे  नाव आहे. २३ जून रोजी शहरातील प्रेयसीसह कुणाला काहीएक न सांगता हा युवक पैठण येथून निघून गेला होता.  मुलीच्या घरच्यांनी याबाबत मिसिंग अर्ज पैठण पोलीस ठाण्यात दिला होता. पोलिसांनी शोध घेऊन अजय दाभाडे व त्याच्या प्रेयसीला १३ जुलै रोजी चाकण येथून परत आणले होते. पोलीस ठाण्यात दोघांनीही आपापल्या घरी जाण्याचे स्वेच्छेने सांगितले होते. 

दरम्यान, प्रेयसीच्या घरच्यांंनी  अजय दाभाडे व परिवारातील सदस्यांना धमकावणे, घरासमोर येऊन दहशत निर्माण करणे, असे प्रकार केल्याने अजय मानसिक तणावात होता. यातूनच त्याने आत्महत्या केली, अशी फिर्याद रविवारी सायंकाळी अजयच्या वडिलांनी पैठण ठाण्यात दिली. यावरून प्रेयसीचे नातेवाईक असलेल्या दोन महिलांसह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद