खुलताबाद : खुलताबाद शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या ७ जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी गुरूवारी छापा मारून उचलले असून या छाप्यात एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस, चार तलवारी व एक कोयता जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी जिल्हयातील अवैधरित्या छुप्यापध्दतीने घातक शस्त्र बाळगुन दहशत माजवणा-या ईसमावर छापामारे करण्यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखा, यांना मोहीम राबविणे बाबत निर्देश दिले असून या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी एक पथक तयार करून गोपनीय माहितीच्या आधारे छापेमारी करण्यासंदर्भात मोहीम आखली.
दिनांक १०/०७/२०२७ रोजी स्था. गु.शाचे पथक खुलताबाद शहरात गस्तीवर असतांना, त्यांना गोपीनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली कि, खुलताबाद शहरातील बडकेआली मोहल्ला, सईदानी माँ मोहल्ला, गुलाबशहा कॉलनी, साळीवाडा ,बाजारगल्ली, कुरेशी मोहल्ला या परिसरातील ०७ ईसमाकडे घातकशस्त्र असुन त्याआधारे ते परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करत आहे.
या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत गोपनीय पध्दतीने नमुद परिसरात सापळा लावुन यातील संशयीत ईसम यांचेवर पाळत ठेवुन त्यांना ताब्यात घेतले यामध्ये १) मोहमंद अल्तमश मोहमंद फईम वय २७ वर्षे रा. बडकेआली मोहल्ला, खुलताबाद २) मोहमंद मुजाहिद निसार कुरेशी वय २४ वर्षे रा. बडकेआली मोहल्ला, खुलताबाद ३) फलक शहा नासेर शहा, वय २२ वर्षे रा. सईदानी माँ मोहल्ला, खुलताबाद ४) फईजान शहा अब्दुल शहा वय २६ वर्षे रा. बाजारगल्ली (साळीवाडा), खुलताबाद यातील आरोपीने त्यांचे राहते घराचे आजुबाजूच्या परिसरात धारधार शस्त्र तलवार, धारधार कोयता शस्त्र लपवुन ठेवलेले पथकाला काढून दिले आहे.
या आरोपीवर पोलीस ठाणे खुलताबाद येथे कलम ४, २५, भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दरम्यान माहिती मिळाली की, खुलताबाद शहराताली गुलाब शहा कॉलनी, पाण्याच्या टाकीजवळ परिसरातील राहणारा अजमत खान अजीज खान हा विनापरवाना बेकायदेशरीपणे गावठी कट्टा बाळगुन आहे.
यावरुन पथकाने लागलीच त्याचा शोध घेतला असता तो त्याच्या राहते घरी असल्याबाबत खात्रीशिर माहिती मिळाल्याने पथकाने त्याचे घराजवळ सापळा लावुन त्यास शिताफिन ताब्यात घेऊन गावठी कट्टा बाबत विचारपुस करता तो पोलीसांना उडवा उडवीचे उत्तरे देव लागल्याने त्याचेवर संशय अधीक बळावल्याने त्यास सखोल विचारपुस करता त्यांने मंडप डेकोरेटरच्य सामानामध्ये लपवून ठेवलेला गावठी कट्टी व दोन जिवंत काडतुस पथकाला काढुन दिले आहे. यावरून आरोपी नामे अजमत खान अजीज खान वय २७ वर्षे रा. गुलाबशहा कॉलनी, खुलताबाद यास ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द पोलीस ठाणे खुलताबाद येथे कलम ३, २५, भारतीय हत्यार कायद्यान्वय गुन्हा दाखल करण्यात आला सदरील कारवाई पोनि विजयसिंग राजपूत,फौजदार दिपक पारधी, श्रीमंत भालेराव, कासिम पटेल, प्रमोद पाटील, सचिन राठोड, शिवाजी मग यांनी केली आहे.