शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोखरीकरांनी करून दाखवले; ZP शाळेसाठी २ एकर जमीन घेऊन ६० लाखाचा निधी उभारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 13:38 IST

मातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारला निधी

ठळक मुद्देगावातील धार्मिक कार्यक्रम टाळून त्याचा निधी दिला शाळेला चार महिन्यांपूर्वी शाळेसाठी १० लाखाचा संगणक कक्ष ग्रामस्थांनी उभारला

औरंगाबाद : जिल्हा परिषद शाळेत १० लाख रुपयाचा संगणक कक्ष उभारल्यानंतर शाळेसाठी २ एकर जमीन आणि ६० लाख रुपयाचा निधी उभारण्याचा संकल्प पोखरी ग्रामस्थांनी पूर्ण केला आहे. २०१९ मधील डिसेंबर महिन्यात शासकीय मदतीशिवाय पोखरी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेत १० लाखाचा निधी खर्च करून अत्याधुनिक संगणक कक्ष उभारल्यानंतर हा संकल्प केला होता.

पोखरी ग्रामस्थांचे ठरले; १० लाखाच्या संगणक कक्षानंतर शाळेसाठी ५० लाख उभारणार

वैजापूर तालुक्यातील पोखरी जिल्हा परिषदेची शाळा आंतरराष्ट्रीय बनविण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे. यासाठी गावकऱ्यांनी शाळेच्या विकासासाठी १५ डिसेंबर २०१९ रोजी ग्रामसभा आयोजित केली होती. या ग्रामसभेत प्रत्येक गावकऱ्यांनी शाळेच्या विकासासाठी योगदान देण्यास सहमती दर्शविली. यावेळी शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी विद्यमान शाळा आंतरराष्ट्रीय करताना तेथील जागा कमी पडत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तेव्हा गावकऱ्यांनी शाळेसाठी २ एकर जागा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार खाजगी व्यक्तीची जमीन खरेदीसाठी लागणारा निधीही गावातूनच उभारण्यासाठी सहमती झाली. यात गावातील प्रत्येक घरासाठी (प्रतिउंबरा) ५ हजार रुपये आणि ५ एकरापेक्षा अधिक शेती असणाऱ्या कुटुंबाला त्यापुढील प्रतिएकर शेतीला १ हजार रुपये अधिक भार देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

मातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारला निधीमातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शाळेला मदत करण्यासाठी गावातील शासकीय आणि अशासकीय नोकरीमध्ये कार्यरत असणाऱ्या ग्रामस्थांनी निधीसाठी पुढाकार घेतला. तसेच गावामध्ये धार्मिक कार्यक्रमांवर पैसे खर्च न करता ते पैसे शाळेसाठी खर्च करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. यासोबतच काही निधी सीएसआर फंडातून जमा झाला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादzp schoolजिल्हा परिषद शाळाfundsनिधीEducationशिक्षण