शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आलिशान कार, बॉडीगार्डसह आलेला 'पीएमओ सचिव' निघाला तोतया; शाही विवाहात खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:33 IST

व्हीआयपी सोहळ्यात 'तोतया' अधिकाऱ्याचा पर्दाफाश! आलिशान कार, अंगरक्षक आणि सरकारी पाट्यांसह ‘पीएमओ सचिव’ बनून आला, थाटमाट पाहून पोलिसही चक्रावले

वाळूज महानगर : धुळे–सोलापूर हायवेवरील तिसगाव येथील हॉटेल ग्रॅण्ड सरोवर येथे रविवारी झालेल्या व्हीआयपी मूव्हमेंट असलेल्या विवाह सोहळ्यात स्वतःला पंतप्रधान कार्यालयातील सचिव आणि नीती आयोगाचा सदस्य असल्याचे भासवून कार्यक्रमात प्रवेश केलेल्या इसमाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. आलिशान इनोव्हा कार, सोबत बॉडीगार्ड, सरकारी पाट्या व तिरंगा ध्वज अशा थाटामाटात फिरणाऱ्या या तोतया अधिकाऱ्याचा भंपकपणा पोलिसांनी उघड केला.

गोपनीय शाखेत कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक सलीम अब्दुल गफूर शेख हे बंदोबस्तावर असताना विवाह सोहळ्यातील सूत्रसंचालकाने “मा. अशोक भारत ठोंबरे – पीएमओ सेक्रेटरी ” असे नाव जाहीर केले. यासंदर्भात पोलिसांकडे कोणतीही अधिकृत माहिती नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्याची पडताळणी करण्यात आली. विचारपूस केली असता त्याने निती आयोगाचा सदस्य असल्याचे सांगितले; मात्र चौकशीत तो गोंधळला व उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्याकडे कोणताही शासकीय ओळख पुरावा नव्हता.

लग्न सोहळ्यातून थेट जेलमध्येअशोक मोठ्या अधिकाऱ्यांसारख्या आलिशान थाटात राहत होता. कार्यक्रमस्थळी तो इनोव्हा (एम एच १२एस एन ९८९२) कारमधून आला. त्याच्यासोबत विकास प्रकाश खंडागळे नावाचा अंगरक्षकही होता. अधिकारीसदृश वागणे, सूट-बूटातील स्टाईल आणि आत्मविश्वास पाहून बडा अधिकारी असल्याचे अशोक भासवत होता. पोलिसांनी कारची पंचांसमक्ष तपासणी केली असता “भारत सरकार” लिहिलेली पाटी, सरकारी वाहनांवर वापरला जाणारा तिरंगा ध्वज व त्याची धातूची कडी, एक सुटकेस सापडली. ही सामग्री दिल्लीहून मागविल्याचे ठोंबरेने कबूल केले.

यापूर्वीही अनेक कार्यक्रमांना उपस्थितीहा भामटा पूर्वीही अनेक कार्यक्रमांना गेला असल्याची माहिती असून, त्याने कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास सुरू आहे. कोणाची फसवणूक झालेली असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी केले. अशोक ठोंबरे (वय ४१, धंदा कन्सल्टन्सी, मु. पो. उंदरी, ता. केज जि. बीड) आणि त्याचा साथीदार विकास खंडागळे (वय ३३, धंदा जिम ट्रेनर, रा. मोर्डा ता. तुळजापूर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोनि नरेश ठाकरे करीत आहेत. सदरील कारवाई पोलिस उपयुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलिस आयुक्त भागीरथी पवार, पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake PMO Secretary Busted at Lavish Wedding with Bodyguards

Web Summary : A man posing as a PMO secretary was arrested at a wedding in Waluj. He arrived in style with bodyguards and a car displaying government insignia. Police investigations revealed his deception, leading to his arrest along with his accomplice.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी