शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

औरंगाबादच्या व्यापाऱ्यांना १५४ प्लॉट देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:02 IST

मोंढा स्थलांतराचा प्रश्न मागील २० वर्षांपासून रखडला आहे. मात्र, आता जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्या टप्प्यात १५४ प्लॉट मोंढ्यातील व्यापाºयांना देण्यास पणन संचालकांनी मंजुरी दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा मोंढा स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देमोंढा स्थलांतर : पणन संचालकांनी दिली मंजुरी; २० वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मोंढा स्थलांतराचा प्रश्न मागील २० वर्षांपासून रखडला आहे. मात्र, आता जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्या टप्प्यात १५४ प्लॉट मोंढ्यातील व्यापाºयांना देण्यास पणन संचालकांनी मंजुरी दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा मोंढा स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने जागा खरेदी करून तेथे १९९७-९८ मध्ये धान्य अडत बाजारासाठी ५ सेल हॉल बांधले. त्यावेळी मोंढ्यातील अडत व्यापाºयांनी जाधववाडीत स्थलांतर केले होते, पण येथील होलसेल किराणा व्यापाºयांनी मात्र, स्थलांतर केले नव्हते. तेव्हापासून दरवर्षी दिवाळीच्या वेळी मोंढा स्थलांतराचा प्रश्न डोके वर काढत असतो. मात्र, आता पणन संचालक आनंद जोगदंडे यांनी मोंढ्यातील ११९ व्यापाºयांना बाजार समितीमध्ये १५४ प्लॉट देण्यास मान्यता दिली. यामुळे मोंढा स्थलांतरासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. जाधववाडीत १५ एकर जागा तत्सम शेतीपूरक व्यवसायासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.येथे होलसेल किराणा व्यापाºयांना पहिल्या टप्प्यात १५४ प्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येथे १५०० ते २००० स्क्वेअर फूटप्रमाणे व्यापाºयांना प्लॉट देण्यात येणार आहेत.पणन संचालकांनी यासाठी ४६५ रुपये स्क्वेअर फूट असा भाव काढला आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सचिव विजय शिरसाट यांनी सांगितले की, व्यापाºयांना प्लॉट दिल्यानंतर तेथे सिमेंटचे रस्ते, पथदिवे सर्व सुविधा पुरविण्यात येतील व त्यानंतर एक वर्षाच्या मुदतीत त्यांना दुकानाचे बांधकाम करून तेथे व्यवसाय सुरू करावा लागणार आहे. दुसºया टप्प्यातील १२० प्लॉटला मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर त्या प्लॉटचीही व्यापाºयांना विक्री करण्यात येणार आहे. व्यापाºयांनी सकारात्मक विचार करावा, असे आवाहनही शिरसाट यांनी केले.पिसादेवी रोडवर जनरल शॉपिंग कॉम्प्लेक्सजाधववाडी कृउबामध्ये प्रवेश करताना पिसादेवी रोडवरील जागा आहे. त्या जागेवर जनरल शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यास पणन संचालकांनी मंजुरी दिली आहे. यात १६० दुकाने असणार आहेत. दोन मजली शॉपिंग कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन जूनच्या पहिल्या पंधरवड्यात करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती सभापती राधाकिसन पठाडे यांनी दिली.मास्टर प्लॅन मंजुरीसाठी मनपा आयुक्तांची घेणार भेटपणन संचालकांनी जाधववाडीत मोंढ्यातील व्यापाºयांना १५४ प्लॉटला मंजुरी दिली आहे. मात्र, अजून मनपाने येथील सुधारित मास्टर प्लॅनला परवानगी दिली नाही. यासंदर्भात मनपाचे नवीन आयुक्त निपुण विनायक यांची लवकरच भेट घेऊन त्यांना या प्रश्नाची माहिती देणार आहेत. त्यांनी मास्टर प्लॅनला परवानगी दिल्यास मनपाचे उत्पन्नही वाढणार आहे. तसेच कृउबाचे सध्याचे वार्षिक उत्पन्न ४ कोटी रुपये आहे ते वाढून ८ कोटींवर जाईल.-राधाकिसन पठाडेसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डAurangabadऔरंगाबादMarketबाजार