शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सुखद ! मुंबईनंतर औरंगाबादेत महापालिकेच्या सीबीएसई शाळा; आठच दिवसात प्रवेश फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 12:34 IST

Admission to Aurangabad Municipal Corporation's CBSE schools is full :१५ ऑगस्टला पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन उद्‌घाटन

ठळक मुद्देप्रायोगिक तत्त्वावर दोन शाळा सुरुप्रत्येक वर्गात केवळ २० विद्यार्थी आठ दिवसांतच शाळेतील प्रवेश पूर्ण

औरंगाबाद : शहरातील गरजू मुला-मुलींना इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळा (CBSE School ) सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासकांनी घेतला आहे. उस्मानपुरा आणि गारखेडा येेथील शाळेत सीबीएसईच्या ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, इयत्ता पहिली व दुसरी वर्गासाठी प्रत्येकी २० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. या शाळांचे उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai ) यांच्या हस्ते होणार आहे. ( Municipal CBSE schools in Aurangabad after Mumbai; Admission full in eight days)

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्या शाळा सुरू करण्यास मान्यता मिळाल्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर दोन शाळा सीबीएसईच्या मान्यतेने सुरू केल्या जाणार आहेत. तेथे पायाभूत सुविधा उपलब्ध असून, सीबीएसईचे वर्ग सुरू करताच पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी गर्दी केली. आठ दिवसांतच शाळेतील प्रवेश क्षमता पूर्ण झाली आहे.

हेही वाचा - हॉटेल्सची वेळ वाढविण्याबाबत आज सायंकाळपर्यंत निर्णय ?

प्रत्येक वर्गात २० मुलांना प्रवेशजुलैअखेरीस दोन्ही शाळांमध्ये सीबीएसईचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. मुलांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, पहिली व दुसरी वर्गासाठी प्रत्येकी २० प्रवेश पूर्ण झाले आहेत. प्रत्येक वर्गात ५० मुलांची प्रतीक्षा यादी आहे. १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते शाळांचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती उपायुक्त संतोष टेंगळे यांनी दिली.

कोण शिकविणार विद्यार्थ्यांनापालिकेतील शिक्षकांमधूनच २५ ते ३० शिक्षक सीबीएसईचे वर्ग घेण्यासाठी निवडण्यात आले आहेत. हे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविणार आहेत. यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या दोन्ही शाळांत सीबीएसई वर्ग योग्य प्रकारे चालविण्यासाठी, शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, केंद्रीय मुख्याध्यापक अहमद पटेल व शशिकांत उबाळे आणि सर्व शिक्षक परिश्रम घेत आहेत.

सीबीएसई शाळांचे १५ ऑगस्टला उद्‌घाटनमुंबई महापालिकेनंतर राज्यात औरंगाबाद महापालिकेने सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. उस्मानपुरा आणि गारखेडा येथील शाळांमध्ये ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता पहिली व दुसरी वर्गासाठी प्रवेश फुल्ल झाले आहेत. या शाळांचे उद्‌घाटन १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSchoolशाळा